शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये , कृषी विभागाचे आवाहन

शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये

Ø कृषी विभागाचे आवाहन

चंद्रपूर दि. 3 जून : 2  ते 4 जून 2021 या कालावधीमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर दि. 5 जून 2021 रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खाते, कृषी हवामान शास्त्र विभाग , पुणे यांनी वर्तवली आहे. जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. अपुऱ्या ओलाव्या वर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. 80-100 मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन, कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

सोयाबीन, तूर ,भुईमूग व मका या पिकांच्या नियोजनाकरीता पेरणीची पूर्वतयारीची कामे करावीत.  विदर्भामध्ये भात पिकासाठी रोपवाटिकांची पूर्वतयारी चालू ठेवावी. खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड पूर्व मशागतीची कामे करावीत. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका या खरीप पीक पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी व वखराच्या पाळ्या देऊन तयार करावी. असे जिल्हयातील शेतकरी बंधूना कृषी विभागामार्फत कळविण्यात येत आहे.

About Vishwbharat

Check Also

खेत में मगरमच्छ देखते ही मची खलबली

खेत में मगरमच्छ देखते ही मची खलबली   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   जांजगीर। …

फळपीक विमा योजनेत बोगस अर्ज : काय आहे प्रकरण?

लागवड न करताच सुमारे साडेदहा हजार शेतकऱ्यांनी फळपिक विम्यासाठी अर्ज केल्यामुळे कृषी विभागाची झोप उडाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *