Breaking News

विविध प्रतिष्ठानाविरुद्ध कारवाई करून २४ हजार ५०० रुपयांचा दंड

Advertisements
विविध प्रतिष्ठानाविरुद्ध कारवाई करून २४ हजार ५०० रुपयांचा दंड

चंद्रपूर, ता. ३ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठ बंद ठेवण्याचे निर्देश होते. तरी सुद्धा शहरातील काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु ठेवून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली. गुरुवारी (ता. ३) विविध प्रतिष्ठानाविरुद्ध कारवाई करून २४ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.

Advertisements

मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार सहायक आयुक्त विद्या पाटील यांच्या नेतृत्वात क्षेत्रिय अधिकारी नरेंद्र बोबाटे, स्वच्छता निरिक्षक महेंद्र हजारे व कर्मचाऱ्यांनी झोन क्रमांक ३ मध्ये व्यवसायिकांवर दंडात्मक कारवाई करुन एकूण १९,५०० दंड वसूल करण्यात आला. तसेच झोन क्र. ०१ अंतर्गत कोव्हीड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याबाबत बाँम्बे टायर्स यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन एकुण ५,००० दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई सहाय्यक आयुक्त शितल वाकडे, क्षेत्रिय अधिकारी भाऊराव सोनटक्के, मुख्य स्वच्छता निरिक्षक प्रदीप मडावी, भरत राजुरकर व  विलास नांदणे यांनी केली. 

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *