इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
पर्यावरणाचे रक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य-डॉ.मंगेश गुलवाडे
इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूरच्या वतीने 1 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रीय डॉक्टर्स डे च्या निमित्याने सेवा सप्ताह कार्यक्रम साजरा केला जात आहे.त्यातीलच एक उपक्रम वृक्षारोपण हे होय. आज वरोरानाका येथील चर्च जवळ वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून ते कर्तव्य प्रत्येकाने प्रामाणिकपणे पार पाडावे व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपले योगदान द्यावे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.सदर कार्यक्रमाला आय. एम ए चे सचिव अनुप पालीवाल, डॉ.भूपेश भलमे, डॉ.राजीव देवईकर,डॉ.रजनीकांत भलमे,डॉ.मंगेश टिपणीस,डॉ.बालमुकुंद पालीवाल आय.एम.ए.चे कोषाध्यक्ष डॉ.प्रवीण पंत,डॉ.सुधीर रेगुंडवार,डॉ. उमेश उत्तरवार, डॉ.प्रसाद पोटदुखे, आय.एम.ए.महिला शाखेच्या प्रमुख डॉ.मनीषा घाटे, डॉ.पल्लवी इंगळे,डॉ.प्रीती चौहान,डॉ.आशिष वरखेडे,डॉ.गोपाल राठी,डॉ.अभिजित सांखारी,डॉ.राहुल सैनानी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती……