Breaking News

एक चिखलात फसून, दुसरा अपघातात बिबट ठार

Advertisements

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील देवलापार वनपरिक्षेत्र आणि रामटेक वनपरिक्षेत्रात दोन वेगवेगळ्या घटनांत दोन बिबट्यांचे मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या. पहिल्या घटनेत गुरुवारी संध्याकाळी पटगोवरी गावानजीक सर्वे क्रमांक ३३९ येथे चिखलात फसून बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट चिखलात फसलेला असताना नागपूर येथील रेस्क्यु पथकाला पाचारण केले.त्यांनी बिबट्याला वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. परंतु तोपर्यंत नाका तोंडात पाणी गेल्याने बिबट्याचा मृत्यू झाला.

Advertisements

दुसऱ्या घटनेत ८ सप्टेंबर रोजी रात्री २ वाजताच्या दरम्यान देवलपार वन परिक्षेत्र, मानेगाव क्षेत्रातील (नॅशनल हायवे ४४) जबलपूर नागपूर हायवे वर वाहन अपघातात एका बिबट्याचा मृत्यू झाला. वन विभागाने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शिके नुसार दोन्ही बिबट्याचे शव विच्छेदन गुरूवारी करण्यात आले.

Advertisements

यापूर्वी १० ऑक्टोबर २०१८ मध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या पिपरीया गावाजवळील बिबट्याच्या पिल्लाचा अपघातात मृत्यू झाला होता. रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेत या बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू झाला होता. तर ३० सप्टेंबर २०२० रोजी नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील नयाकुंड शिवारात बिबट्याचा मृतदेह दिसून आला होता.

वनविभागाचे आवाहन

नागपूर जिल्ह्यात अपघातात वन्यजीव ठार होण्याच्या घटनांमध्ये अलिकडे वाढ होत आहे. जंगलातून जाणाऱ्या महामार्ग तसेच रस्त्यावरून वाहनचालकांनी वाहने हळूहळू चालवावी, असे आवाहन वनखात्याने केले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

श्रीक्षेत्र कोराडी तीर्थ हनुमान मंदिर प्रांगण में अभि इंजिनियरिंग कार्पोरेशन की ओर से संगीतमय सुंदरकांड

श्रीक्षेत्र कोराडी तीर्थ हनुमान मंदिर प्रांगण में अभि इंजिनियरिंग कार्पोरेशन की ओर से संगीतमय सुंदरकांड …

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रित्यर्थ मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिर संपन्न

भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या जयंती प्रित्यर्थ मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिर संपन्न टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *