Breaking News

नागपूर जिल्ह्यात आधार जोडणी अभियान

Advertisements

नागपूर : मतदार नोंदणीला आधार क्रमांक जोडण्यासाठी मतदारांच्या सुविधेसाठी विशेष शिबिर रविवारी, 11 सप्टेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आयोजित केले आहे. तरी जिल्ह्यातील मतदारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

प्रक्रिया सुयोग्य

Advertisements

मतदान ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम १ ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. विद्यमान मतदारांकडून त्यांची ओळख प्रस्थापित करण्यासाठी मतदार यादीतील त्यांच्या नोंदीचे प्रमाणीकरण करण्यासाठी ही प्रक्रिया होईल. त्याचप्रमाणे, एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा त्याच मतदारसंघाचे नाव एकापेक्षा जास्त वेळा नोंदविले गेले किंवा कसे, याची शहानिशा करण्यासाठी मदत होईल.

Advertisements

प्रक्रिया जाणून घ्या

विद्यमान मतदारांनी नमुना अर्ज क्रमांक ‘सहा ब’मध्ये आधार क्रमांक मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे दाखल करावयाचा आहे. तसेच व्होटर हेल्प लाईन ऍप व https://nvsp.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. मतदार आपला आधार क्रमांक त्याद्वारे नोंदवू शकता.

लाभ घ्या

मतदारांना आधार क्रमांक मतदार ओळखपत्र सोबत संलग्न करण्यासाठी ११ सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हजर असतील. सर्व मतदारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.

अवैध मतदानाला आळा

भविष्यात नागपूर मनपा व जिल्हास्तरीय काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होतील. यामुळे जिल्हयात पारदर्शन निवडणूक प्रक्रिया संपन्न व्हावी, या दृष्टीने कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मतदान कार्डला आधार कार्ड जोडणीमुळे अन्य मतदार संघात किंवा एका पेक्षा दोन मतदार संघातील मतदान कार्ड असल्यास त्यावर आळा बसेल. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक उत्तम होईल.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपूर शहरातील पंचनामे सुरु : ग्रामीणमधील 27 तलाठी सहभागी

नागपूर शहरात शनिवारी नाग नदीच्या पुरामुळे ज्या घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले. त्या घरांचे पंचनामे …

ऊर्जामंत्र्यांच्या नागपूर शहरात १०७ वीजचोऱ्या उघड

ऊर्जामंत्री व उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात महावितरणच्या नागपूर शहर मंडळ आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *