Breaking News

‘व्हाट्सअँप’द्वारे मिळणार १० लाखांचं कर्ज : फक्त मेसेज करा, मोबाईल क्रमांक जाणून घ्या…!

Advertisements

गरजूला कर्जासाठी बँकेच्या चकरा माराव्या लागतात. तसेच झेरॉक्स आणि विविध कागदपत्रांच्या मूळ प्रती सोबत ठेवाव्या लागतात. मात्र, आता डिजिटल युगात अनेक त्रासातून सुटका होऊ लागली आहे. आता संबंधित बँक किंवा वित्तीय कंपनीच्या मोबाइल अॅप आणि वेबसाइटवर अर्ज करून क्षणार्धात कर्ज घेता येणार आहे. विशेष म्हणजे कर्ज प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून आणखी एक पाऊल टाकत खासगी फायनान्स कंपनीने ग्राहकांना व्हॉट्सअॅपवर कर्ज देण्याची सुविधा सुरू केली आहे. खरं तर तुम्हाला १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज मिळू शकते.

Advertisements

एका कंपनीने सांगितले की, ग्राहकांना व्हॉट्सअॅपद्वारे १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देणार आहे. खरं तर हे व्यावसायिक कर्ज असेल आणि त्वरित मंजूर केले जाईल.

Advertisements

जाणून घ्या प्रक्रिया

व्हॉट्सअॅपद्वारे तुम्ही कर्ज कसे घेऊ शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.१००% डिजिटल प्रक्रियेद्वारे कर्ज मिळणार IIFL फायनान्सने WhatsApp वर ग्राहकांसाठी झटपट मंजुरीसह १० लाखांपर्यंतच्या व्यावसायिक कर्जाची घोषणा केली आहे. WhatsApp वर IIFL फायनान्सचे व्यावसायिक कर्ज हे MSME कर्ज क्षेत्रातील पहिल्या प्रकारचा उपक्रम आहे, जेथे कर्ज अर्जापासून ते वितरणापर्यंत १०० टक्के डिजिटलीकरण केले जाणार आहे. व्हॉट्सअॅपद्वारे १० लाखांच्या कर्जासाठी अर्ज करताना ग्राहकांना एआय-बॉटला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी ९०१९७०२१८४ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर “hi” पाठवा. ही पूर्णपणे पेपरलेस प्रक्रिया असून, ज्यामध्ये कोणतीही कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. देशातील ४५० दशलक्षाहून अधिक WhatsApp वापरकर्ते IIFL फायनान्सकडून या २४×७ एंड-टू-एंड डिजिटल कर्ज सुविधेचा लाभ घेऊ शकतात. आयआयएफएल फायनान्सचे बिझनेस हेड भरत अग्रवाल म्हणाले, “आम्ही व्हॉट्सअॅपवर एका सोप्या पेपरलेस प्रक्रियेद्वारे कर्ज अर्ज आणि वितरण पूर्णपणे सहज उपलब्ध करून दिले आहे, ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

‘ईएमआय’ वाढणार?RBI ची महागाईवर मोठी घोषणा

भारतीय रिझर्व्ह बँकने तीन दिवसीय MPC बैठकीतील निर्णय जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या …

२००० रुपयांची नोट घरबसल्या बदलता येणार काय?प्रक्रिया कोणती?

भारतीय रिझर्व्ह बँक ने १९ मे रोजी संध्याकाळी २००० रुपयांच्या नोटेबाबत मोठी घोषणा केली. घोषणेनंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *