Breaking News

चला, पर्यटनाला आणि 71 लाख रुपये मिळवा…!

एखाद्या देशात पर्यटनाला गेल्‍यानंतर तेथेच स्‍थायिक व्‍हावे, असे क्षणभर वाटून जाते. मात्र आपला मूळ देश सोडून कायमस्‍वरुपी परदेशात स्‍थायिक होणे आव्‍हानात्‍मकच असते. रोजगार आणि शिक्षणानिमित्त आज जगभरता स्‍थलांतरीत नागरिकांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

पण एका देशाने स्‍थलांतरित नागरिकांनी कायमस्‍वरुपी वास्‍तव्‍य करावे म्‍हणून काही लाखांची रक्‍कम देण्‍याची घोषणा केली आहे, हे तुम्‍हाला अविश्वसनीय वाटेल; पण आयर्लंडने अशी घोषणा कली आहे. देशात कायमस्‍वरुपी वास्‍तव्‍यास येणार्‍या प्रत्‍येक स्‍थलांतरित नागरिकाला सुमारे ७१ लाख रुपये देण्‍याची घोषणा येथील सरकारने केली आहे.

आयर्लंडला आपल्या बेटांवर लोकसंख्या वाढवायची आहे. त्यासाठी त्यांनी एक योजना सुरू केली आहे. ज्याला आयर्लंडच्या या बेटांवर स्थायिक व्हायचे असेल, त्याला तेथील सरकारकडून ८० हजार युरो म्हणजेच सुमारे ७१ लाख रुपये दिले जाणार असल्‍याचे वृत्त ‘युरो न्‍यूज’ने प्रकाशित केले आहे.

कारण काय?

बेटांवरील लोकसंख्‍या वाढीसाठी आर्यलंड सरकारने विशेष धोरण आखले आहे. हे धोरण आयर्लंड सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरही पोस्ट केले आहे. यामध्‍ये म्‍हटले आहे की, शाश्वत समुदाय पुढील अनेक वर्षे ऑफशोअर बेटांवर वास्‍तव्‍य करतील. ही संधी साधणारे आर्थिकदृष्‍ट्या भरभराट करू शकतील. स्‍थलांतरित नागरिक या बेटांवरील अद्वितीय संस्कृती, वारसा आणि पर्यावरणीय समृद्धी जतन करतील, असा आम्‍हाला विश्‍वास आहे.

बेटांवर येणाऱ्या पर्यटकांनी सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरणीय समृद्धीचा अनुभव घ्यावा, अशी आमची इच्छा आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी १ जुलैपासून अर्ज उपलब्ध होतील, असेही आयरिश सरकारने स्‍पष्‍ट केले.

About विश्व भारत

Check Also

पाक के खिलाफ बड़ी कार्रवाई के लिए तीनों भारतीय सेना प्रमुख एक जुट

पाक के खिलाफ बड़ी कार्रवाई के लिए तीनों भारतीय सेना प्रमुख एक जुट टेकचंद्र सनोडिया …

3 दुश्मन देश पाकिस्तान के साथ : युद्ध की स्थिति में समर्थन देने का ऐलान

3 दुश्मन देश पाकिस्तान के साथ : युद्ध की स्थिति में समर्थन देने का ऐलान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *