मी कुणाच्या मागे लागत नाही, पण लागलो तर सोडत नाही. ज्यांना अलमारीत सांगाडे आहेत ते बाहेर येतील. मी परिवारवादी पार्टी म्हणलं तर त्यांना झोंबलं. उद्धव ठाकरे कांच के घर में रहते है और कांच के घर में रहने वाले दुसरोंके घरमें पथ्थर नही फैंकते. माझ्या परिवाराचं काही असेल तर समोर आणून मांडा, असा थेट इशारा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिला.
‘काल मी परिवारवादी पार्टी म्हणालो तर उद्धवजींना फारच झोंबलं. उद्धवजी तुमको मिरची लगी तो मै क्या करू? फारच झोंबलं. आधी ते मुख्यमंत्र्यांच्या नातवावर गेले होते, काल माझ्या पत्नीवर आले. पण उद्धव ठाकरे मी काचेच्या घरात राहत नाही, तुम्ही काचेच्या घरात राहता. काचेच्या घरात राहणारे दुसऱ्यांच्या घरावर दगड मारत नाहीत. आमचं जीवन खुली किताब आहे, माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे. मी असेन, माझा परिवार असेल, तुमच्याकडे काहीही असलं तर खोलून दाखवा,’ असं आव्हान फडणवीसांनी दिलं.
‘देवेंद्र फडणवीस कुणाच्या भानगडीत पडत नाही, पण पडला तर सोडत नाही, त्यामुळे एवढं लक्षात ठेवा ज्याच्या अलमारीमध्ये सांगाडे पडले आहेत त्यांनी सावकारीचा आव आणण्याचं कारण नाही. सांगाडे बाहेर निघतील, नक्की निघतील. बाहेर काढून दाखवू,’ असा इशाराच फडणवीसांनी ठाकरेंना दिला आहे.
‘जनतेच्या आशिर्वादाने आपलं सरकार आलं, पण उद्धव ठाकरेंनी खुर्चीकरता आपल्या पाठीत खंजीर खुपसला. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायला लागलं तर दुकान बंद करेन, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, पण उद्धव ठाकरे त्याच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसले,’ अशी टीका फडणवीसांनी केली.
‘असंगाशी संग जास्त काळ चालू शकत नाही. त्यांच्यातलाच एक मावळा उठला आणि एकनाथ शिंदे म्हणाले हिंदुत्वविरोधी लोकांसोबत बसू शकत नाही. सरकार गेल्यानंतर राष्ट्रवादीवालेही बेईमानी केली म्हणाले. सभी करे तो रासलिला, मैं करू तो कॅरेक्टर ढिला है, तशी अवस्था आहे,’ असा निशाणा देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीवर साधला.
विश्वभारत News Website