Breaking News

महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री लवकरच मिळणार!सुप्रिया सुळे यांचा मार्ग मोकळा

Advertisements

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. हा राजकीय भूकंप नाही, या गोष्टी घडणारच होतं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाण्याची ही सुरूवात झाली आहे. शिंदे फार काळ मुख्‍यमंत्री पदावर राहणार नाहीत. लवकरच महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळेल, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राजकीय घडामोडीवर प्रसार माध्यमांशी बोलताना केला. तर सुप्रिया सुळे यांचा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जाते.

Advertisements

शिंदे गट बेकायदेशीर ठरणार

Advertisements

राऊत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र होणार आहेत. त्यामुळे शिंदे गट बेकायदेशीर ठरणार आहेत. परिणामी अजित पवारांच्या पाठिंब्याची गरज भाजपला होतीच. हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीने मोहीम राबवली होती. यावर आता भाजप काय बोलणार हे पाहावे लागेल. शपथविधीवेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होत्या. शिंदे सरकारला लोकांचा पाठिंबा नाही. भविष्यात आम्ही सर्वजण एकत्र राहू, असा विश्‍वासही राऊत यांनी व्‍यक्‍त केले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कैबिनेट मंत्री बावनकुळेके करकमलों “PM ई-बस” सेवा का उद्घाटन 

कैबिनेट मंत्री बावनकुळेके करकमलों “PM ई-बस” सेवा का उद्घाटन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नागपुर। …

वह नेता कौन? अजित पवार हादसे में खलबली

महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार की एक विमान हादसे में मौत के बाद 10 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *