Breaking News

आमदाराच्या निकटवर्तीयचा समावेश : दरोड्याच्या तयारीत असलेल्या आठ जणांना अटक

Advertisements

दरोड्याच्या तयारीत असलेल्या आठ जणांना शस्त्रसाठ्यासह पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी दोन वाहनं आणि प्राणघातक शस्त्रे, मिरची पावडर, दोरी, हॉकी स्टिक, लोखंडी रॉड, चाकू, काठ्या आणि सात मोबाईल जप्त केले आहेत. याप्रकरणी भंडारा पोलिसात आर्म ॲक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

या कारवाईमुळे भंडारा शहरात मोठी खळबळ माजली आहे. आरोपींपैकी सात जण गोंदिया जिल्ह्यातील तर एक जण भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलिसांना वेळीच माहिती मिळाली आणि मोठा अनर्थ टळला. वसीम उर्फ टिंकू खान, विनायक नेवारे, शहाबाज शाबीर खान, प्रकाश भालादरे, संकेत बोरकर, संजय पाटील, रोहन ठाकरे आणि रमेश खोब्रागडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Advertisements

पहाटेच्या सुमारास सापळा रचून आरोपीला अटक
दरोड्याच्या तयारीत काही आरोपी गोंडियातून भंडाऱ्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी पहाटेच्या सुमारास गोंदियातून दोन वाहनांतून भंडाऱ्यात येणाऱ्या आरोपींना सापळा रचून अटक केली. आरोपींकडून प्राणघातक शस्त्रे, मिरची पावडर, दोरी, हॉकी स्टिक, लोखंडी रॉड, चाकू, काठ्या असं दरोडा आणि घातपात घडविण्याचे साहित्यासह सात मोबाईल जप्त केले आहेत.

एक आरोपी आमदाराचा निकटवर्तीय

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी एक आरोपी भंडाऱ्यातील असून, तो राज्यातील सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता आहे. तो भंडाऱ्यातील एका आमदाराचा निकटवर्तीय म्हणून त्याची ओळख आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मेडिकल की आड़ में अवैध हथियारों का कारोबार:डॉक्टर सिंह गिरफ्तार

मेडिकल की आड़ में अवैध हथियारों का कारोबार:डॉक्टर सिंह गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 पटना। …

एक्स्ट्रा मैरिटल अफेयर का मामले में 7 कर्मचारी गिरफ्तार

एक्स्ट्रा मैरिटल अफेयर का मामले में 7 कर्मचारी गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नासिक। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *