Breaking News

धनगर समाजाला आरक्षण कधी मिळणार? आरक्षणातील त्रुटी दुर करून केंद्र सरकारने समाजाला न्याय द्यावा : माजी मंत्री प्रा. राम शिंदे

Advertisements

धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे. लवकर आरक्षण मिळावे ही धनगर समाजाची मागणी आहे. गेल्या 70 ते 75 वर्षांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज लढत आहे. धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ देण्यासाठी केंद्र सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनात धनगर आरक्षणातील त्रुटी दुर करून धनगर समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी आमदार प्रा. राम शिंदे यांनी श्री क्षेत्र चोंडी येथे बोलताना केली.

Advertisements

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चोंडी (ता.जामखेड) येथे यशवंत सेनेच्या वतीने धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाचे अंदोलन हाती घेतले आहे. या अंदोलनाला आमदार प्रा राम शिंदे यांनी आज 9 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी भेट दिली. यावेळी त्यांनी उपोषणकर्ते माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले, यशवंत सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव दांडगे पाटील, आण्णासाहेब रूपनवर, गोविंद नरवटे, सुरेश बंडगर, अक्षय शिंदे, नितिन धायगुडे यांची भेट घेतली.

Advertisements

यावेळी आमदार प्रा. शिंदे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याचबरोबर अंदोलकांच्या मागण्या समजून घेतल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा सरचिटणीस पांडूरंग उबाळे, ज्योती क्रांतीचे चेअरमन अजिनाथ हजारे, उपसरपंच कल्याण शिंदे, बाबासाहेब शिंदे पाटील, उमेश रोडे, आप्पासाहेब उबाळे, सतिश शिंदे, प्रकाश गलांडे, आलेश शिंदे, सुजित शिंदे, रावसाहेब खरात, दत्ता शिंदे, सह आदी उपस्थित होते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

न्यूज प्रसार सेवा मे यूट्यूब सोशल मीडिया पोर्टल न्यूज आगे

न्यूज प्रसार सेवा मे यूट्यूब सोशल मीडिया पोर्टल न्यूज आगे टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

यूट्यूब-सोशल मीडिया पोर्टल बातम्या वृत्तप्रसारामध्ये आघाडीवर

यूट्यूब-सोशल मीडिया पोर्टल बातम्या वृत्तप्रसारामध्ये आघाडीवर टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक.रिपोर्ट मुंबई. यूट्यूब, सोशल मीडिया पोर्टल, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *