Breaking News

अभिनेता श्रेयस तळपदेला शूटिंगमध्ये हृदयविकाराचा झटका : डॉक्टर म्हणाले…

मराठी-हिंदी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. श्रेयस तळपदे वेलकम टू जंगल या चित्रपटांचं चित्रिकरण करत होता ते चित्रीकरण संपवून जेव्हा तो घरी आला तेव्हा ही घटना घडली. वेलकम टू जंगल सिनेमाच्या चित्रीकरणानंतर ४७ वर्षीय श्रेयस तळपदे घरी आला. त्याने पत्नीला अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर मुंबईतल्या अंधेरीमध्ये असलेल्या बेलव्हू रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचंही समजतं आहे.

नेमकं काय घडलं?

एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली की श्रेयस तळपदे हा दिवसभर चित्रीकरण करत असताना एकदम व्यवस्थित होता. त्याने चित्रीकरणही व्यवस्थित आटोपल. वेलकम टू जंगल या सिनेमाचं चित्रीकरण करताना तो हास्यविनोदही करत होता. एक दोन साहस दृश्यंही त्याने चित्रीत केली. मात्र तो घरी आला तेव्हा त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्याने त्याच्या पत्नीला ही बाब सांगितली. ज्यानंतर ती त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ लागली. त्याचवेळी त्याला चक्कर आली. ANI ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

रुग्णालय प्रशासनाने काय म्हटलं?
रुग्णालयाने हे म्हटलं आहे आज रात्री १० वाजण्याच्या सुमारास श्रेयस तळपदेची अँजिओप्लास्टी करण्यात आली. तसंच आता श्रेयस तळपदेच्या प्रकृतीत सुधारणा आहे. श्रेयस तळपदे दिवसभर चित्रीकरण करत होता. त्यावेळी त्याला काहीही झालं नाही. तो घरी आल्यानंतर त्याला अस्वस्थता जाणवू लागली. त्याची पत्नी दिप्ती याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी धाव घेतली. त्याच दरम्यान त्याला चक्कर आली.

श्रेयस तळपदेने मराठी आणि हिंदी अशा दोन्ही चित्रपटसृष्टींमध्ये नाव कमावलं आहे. इकबाल हा त्याचा पहिला हिंदी सिनेमा आहे. ओम शांती ओम या सिनेमात तो शाहरुख खान सह झळकला होता. तसंच पुष्पाच्या हिंदी व्हर्जनला त्याने आवाज दिला होता. त्यामुळे त्याच्या आवाजाची वाहवा झाली होती. गोलमाल रिटर्न्स, हाऊसफुल २ अशा अनेक हिट सिनेमांमध्ये श्रेयस तळपदेने काम केलं आहे. इमर्जन्सी या कंगनाच्या सिनेमात श्रेयस तळपदेने भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं पात्र साकारलं आहे. वेलकम टू जंगल या सिनेमाचं चित्रीकरण संपवून श्रेयस तळपदे घरी आला आणि त्याला अस्वस्थता जाणवली.

चित्रपटात कोण आहेत कलाकार?

या सिनेमात अक्षय कुमार, रवीना टंडन, दिशा पटानी, जॅकलिन, लारा दत्ता, संजय दत्त, परेश रावल, अर्शद वारसी, तुषार कपूर, जॉनी लिवर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक, राहुल देव आणि मिका यांच्या भूमिका आहेत.

About विश्व भारत

Check Also

CM देवेंद्र फडणवीस ने की कोराडी जगदंबा देवस्थान में पूजा अर्चना

CM देवेंद्र फडणवीस ने की कोराडी जगदंबा देवस्थान में पूजा अर्चना टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

प्रसिद्ध अभिनेत्रीसाठी निर्माते पैशांनी भरलेल्या बॅगा आणायचे : तरीही करिअर झालं उद्ध्वस्त

मॉडेलिंग सोडून या अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. कमी बजेटच्या चित्रपटातून अभिनेत्रीला प्रचंड यश मिळाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *