Breaking News

तहसीलदाराने घेतली लाच : घरी सापडले तब्बल ४६ लाख

Advertisements

लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील तहसिलदार सचिन शंकरलाल जैस्वाल यांचा बंगला व निवासस्थानी तब्बल ४६ लाखांची रोकड सापडल्याची माहिती आहे.

Advertisements

तहसीलदार जैस्वाल, शिपाई पंजाब ताठे, चालक मंगेश कुलथे यांना ५ हजारांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. यानंतर लाचलुचपत विभागाने वेगाने कारवाईची सूत्रे हलविली. बुलढाणा येथील कर्मचाऱ्यांच्या पथकाने जैस्वाल यांच्या सिंदखेडराजा येथील शासकीय निवासस्थानाची झाडाझडती घेतली. तिथे नोटांचे ढीगच हाती लागले. त्याठिकाणी तब्बल ३७ लाख ५२ हजार रुपयांची रक्कम आढळून आली. त्यांच्या परभणी येथील घराची परभणी एसीबीने झडती घेतली असता तिथे ९ लाख ४० हजाराची रक्कम आढळून आली. पुढील तपासात आणखी मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता आहे.

Advertisements

तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून अवैधरित्या वाळू वाहतुक करण्यासाठी त्यांना ३५ हजाराची लाच मागण्यात आली होती. त्यांनी तक्रार केल्यावर विभागाने कारवाई केली. यानंतर मात्र मोठेच घबाड हाती लागले. सदर रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्याच्याकडील इतर मालमत्तांचा शोध सुरू असून सिंदखेडराजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मेडिकल की आड़ में अवैध हथियारों का कारोबार:डॉक्टर सिंह गिरफ्तार

मेडिकल की आड़ में अवैध हथियारों का कारोबार:डॉक्टर सिंह गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 पटना। …

एक्स्ट्रा मैरिटल अफेयर का मामले में 7 कर्मचारी गिरफ्तार

एक्स्ट्रा मैरिटल अफेयर का मामले में 7 कर्मचारी गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नासिक। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *