Breaking News

100 हून अधिक महिलांवर बलात्कार करणाऱ्या जलेबी बाबाचं काय झालं?

Advertisements

बिल्लू उर्फ जलेबी बाबा याचा हरियाणातील हिसार तुरुंगात मृत्यू झाला आहे. जलेबी बाबा याला 100 हून अधिक महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती. तो 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत होता. जलेबी बाबाने महिलांवर बलात्कार करताना व्हिडीओ देखील चित्रीत केले होते. जलेबी बाबा उर्फ ​​बिल्लू अमरपुरी असे त्याचे पूर्ण नाव असून तो हिसार येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. चहामध्ये गुंगीचे औषध मिसळून जलेबी महिलांना बेशुद्ध करायचा. यानंतर तो त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि त्याचे व्हिडीओ चित्रीकरणही करायचा. जलेबीची बुधवारी (8 मे 2024) प्रकृती अचानक बिघडली होती. ज्यामुळे त्याला अग्रोहा सरकारी रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर जलेबीला मृत घोषित केले होते.

Advertisements

जलेबी बाबा तंत्रमंत्राच्या नावाखाली महिलांना गुंगीचे औषध पाजून त्यांना बेशुद्ध करायचा आणि नंतर त्यांच्यावर बलात्कार करायचा. किमान 120 महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप जलेबी बाबावर होता. जलेबी व्हिडीओ चित्रीत करायचा आणि त्याच्या सीडी बनवायचा. पोलिसांना कारवाईदरम्यान या सीडी देखील सापडल्या होत्या. जुलै 2018मध्ये या बाबाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यानंतर हे प्रकरण सर्वांसमोर आले.

Advertisements

वर्ष 2018मध्ये गुन्हा दाखल झाला होता

जलेबीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हरियाणातील टोहानातील नागरिक संतप्त झाले होते. तिथल्या लोकांनी जलेबीविरोधात अनेकदा आंदोल केले. या आंदोलनांमुळे पोलिसांनी जलेबी बाबाविरोधात अखेर गुन्हा नोंदवला. 19 जुलै 2018 रोजी हा गुन्हा नोंद करण्यात आला होता. 1 नोव्हेंबर 2020 रोजी जलेबी बाबाविरोधात 200 पानी आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या कालावधीत 20 जणांची साक्ष घेण्यात आली होती, ज्यामध्ये अल्पवयीन मुली, पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिकच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

पतीच्या मित्राकडून विवाहितेवर अत्याचार

यवतमाळ जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या एका प्राध्यापक मित्राने विवाहितेस पेढ्यात गुंगीचे औषध …

नागपुरातील भाजप आमदार कृष्णा खोपडेंची फसवणूक

भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांची एका ठकबाजाने आर्थिक फसवणूक केली. आरोपीने दिलेल्या खोट्या माहितीवर विश्वास …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *