Breaking News

तब्बल ३० किसिंग सीन : तरीही सिनेमा अन् करिअर फ्लॉप

बॉलीवूड झगमगाट आहे. असे अनेक स्टार आहेत, ज्यांना बरीच वर्षे संघर्ष करून इंडस्ट्रीत काम मिळवलं. तर काही लोक असे आहेत ज्यांना वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करूनही यश मिळालं नाही. काही कलाकार तर पहिल्या चित्रपटामुळे रातोरात यशाच्या शिखरावर पोहोचले, पण त्यांचे स्टारडम फार काळ टिकले नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबरोबर सांगणार आहोत, जिने एकाच चित्रपटात ५-१० नव्हे तर तब्बल ३० किसिंग सीन दिले होते. पण तरीही तिचं करिअर मात्र यशस्वी झालं नाही.

 

आपल्या अभिनय व बोल्डनेसमुळे चर्चेत राहणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव सोनल चौहान. मागच्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेल्या या अभिनेत्रीने बरेच चित्रपट केले आहेत. पण तिला हवं तसं यश मिळालं नाही.

 

उत्तर प्रदेशातील नोएडा येथे जन्मलेल्या सोनल चौहानने २००५ मध्ये मिस वर्ल्ड टुरिझमचा किताब जिंकला. त्यानंतर ती हिमेश रेशमियाच्या ‘समझो ना’ या गाण्यात दिसली आणि मग तिने हिंदी चित्रपटांमध्ये प्रवेश केला.

 

सोनल चौहानचा पहिला चित्रपट इमरान हाश्मीसोबतचा ‘जन्नत’ होता. जो २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामुळे ती रातोरात स्टार बनली. पण त्यानंतर, अभिनेत्रीचा कोणताही चित्रपट मोठ्या पडद्यावर काही कमाल करू शकला नाही. २०१३ मध्ये, ती ‘३जी – अ किलर कनेक्शन’ या चित्रपटात दिसली. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता नील नितीन मुकेश होता.

 

तब्बल ३० किसिंग सीन, पण चित्रपट ठरला फ्लॉप

या चित्रपटात सोनल व नितीनने ३० किसिंग सीन दिले होते, पण तरीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळला होता. चित्रपट फ्लॉप झाल्यावर सोनाल दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळली. तिथे तिने अनेक मोठ्या स्टार्सबरोबर तिने काम केलं आणि हिट चित्रपट दिले. सोनलने ‘बुड्ढा होगा तेरा बाप’, ‘जॅक अँड दिल’, ‘द घोस्ट’ सारखे चित्रपट केले आणि तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्येही नशीब आजमावले. २०२३ मध्ये, तिने ‘आदिपुरुष’ मध्ये मंदोदरीची भूमिका साकारली होती.

 

सोनल चौहान आता चित्रपटांमध्ये फार दिसत नाही. पण ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती सोशल मीडियावर तिचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. सोनलचे इन्स्टाग्रामवर ८.१ मिलियन फॉलोअर्स आहेत.

About विश्व भारत

Check Also

प्रसिद्ध अभिनेत्रीसाठी निर्माते पैशांनी भरलेल्या बॅगा आणायचे : तरीही करिअर झालं उद्ध्वस्त

मॉडेलिंग सोडून या अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. कमी बजेटच्या चित्रपटातून अभिनेत्रीला प्रचंड यश मिळाले. …

सलमान खानच्या हाती राम मंदिराचं चित्र असलेलं घड्याळ

अभिनेता सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट रमजान ईदच्या दिवशी प्रदर्शित होत आहे. सलमान खान सध्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *