Breaking News

मुख्यमंत्र्यांना नागपूर जिल्हाधिकारी शोधण्यास विलंब का?जिल्ह्याची सूत्रं कुणाच्या हाती?

Advertisements

नागपूर : नागपूर राज्याची उपराजधानी आहे. अनेक महत्त्वाचे स्थान येथे आहेत. राज्याचे एक अधिवेशन येथे होते. त्याच प्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथील असून महसूल मंत्री जिल्ह्यातील आहेत. तसेच केंद्रातील प्रमुख मंत्री नितीन गडकरी सुद्धा नागपूरचे आहेत. येथे काम करणे आव्हानात्मक समजले जाते. येथे काम करणारे अधिकारी महत्त्वाच्या ठिकाणी कार्यरत राहिलेत. त्यामुळे अनेक अधिकारी येथे जिल्हाधिकारी पदावर काम करण्यास इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. राजकीय मंडळींनाही अधिकारी हवे असतात. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची महापालिका आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी पदावर कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisements

 

इटनकर यांची कारकीर्द

Advertisements

जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या पदासाठी अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा आहे. डॉ. इटनकर ११ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हाधिकारी पदावर रुजू झाले होते. ते तीन वर्षांपेक्षा जास्त काळ या पदावर होते. ते मनुकुमार श्रीवास्तव यांच्यानंतर सर्वाधिक काळ जिल्हाधिकारी पदावर राहणारे अधिकारी ठरले. इटनकर यांचा कार्यकाळ यशस्वी राहिला. सरकारच्या योजनांना त्यांनी गती दिली. मुख्यमंत्री ‘वॉर रूम’च्या धर्तीवर त्यांनी जिल्ह्यासाठी ‘वॉर रूम’ तयार केली. त्यामुळेच त्यांच्याकडे मिहानची जबाबदारी देण्यात आली. कर्मचाऱ्यांशी संबंधित अनेक विषय त्यांनी मार्गी लावलेत. त्यांचे काम बघताच त्यांची महापालिका आयुक्त पदावर नियु्क्ती करण्यात आली. इटनकर यांना पश्चिम महाराष्ट्रात जाण्याची इच्छा होती. परंतु काम बघता त्यांच्या नियुक्तीसाठी सत्ताधारी पक्षातीलच नेते आग्रही असल्याची माहिती आहे.

 

जिल्हाधिकारी पदाची पार्श्वभूमी

नागपूरचे जिल्हाधिकारी पद हे महत्त्वाचे समजले जाते. या पदावर काम करणारे अधिकारी नंतर मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले आहेत. शिवाय मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री येथीलच आहेत. त्याचप्रमाणे राज्याचे एक अधिवेशन येथे होते. येथे काम करणे मोठे आव्हानच समजले जाते. अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क येतो. त्यामुळे येथे काम करण्यासाठी अनेक जणांची इच्छा असते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

सत्ता की दहलीज पर तामिलनाडु CM की रेस में अभिनेता विजय

सत्ता की दहलीज पर तामिलनाडु CM की रेस में अभिनेता विजय टेकचंद्र शास्त्री: 9822550220 चैन्नई। …

भाजप आमदाराच्या ‘पीए’ची अधिकाऱ्याला शिवीगाळ : जंगल सफारी

भाजपचे आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांचे स्वीय सहायक (पीए) महेश प्रेमळवार यांनी व्यवस्थापन कोट्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *