Breaking News

पत्नीच्या त्रासामुळे न्यायाधीशाने केली आत्महत्या

Advertisements

दिल्ली ज्युडिशिअल सर्व्हिसेसमधील (दिल्ली न्यायिक सेवा) एका अधिकाऱ्याचा सफदरजंग परिसरातील त्यांच्या राहत्या घरी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कुटुंबीयांनी छळाचा आरोप करत मृत्यूच्या कारणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

Advertisements

 

अमन कुमार शर्मा (३०) असे मृताचे नाव असून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्राथमिक चौकशीनुसार, त्यांचा मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचे समोर आले असल्याचे पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे. अमन यांचा मेहुणा शिवम याने केलेल्या पीसीआर कॉलनंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चौकशीची प्रक्रिया सुरू केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

Advertisements

 

“आतापर्यंत कोणताही घातपात झाल्याचे सिद्ध झालेले नाही. मात्र, सर्व बाजूने तपास सुरू आहे”, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, अमन गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते आणि त्यांनी छळाची तक्रारही केली होती. अमनचे नातेवाईक राजेश शर्मा यांनी पीटीआयला सांगितले की, मुलाच्या निधनाची बातमी समजल्यानंतर त्याचे वडील प्रेम शर्मा यांना मोठा धक्का बसला आहे. राजेश शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या रात्री अमनने रात्री १० वाजता वडिलांना फोन करून आपली व्यथा मांडली होती.

 

रात्री पती-पत्नींमध्ये वाद

“मी खूप त्रासात आहे आणि आता जगणे कठीण झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून माझा छळ होत आहे”, असं अमनने वडिलांना सांगितल्याचा दावा राजेश शर्मा यांनी केला. या माहितीनंतर प्रेम शर्मा तातडीने अलवरहून दिल्लीला पोहोचले. अमनचा त्याच्या पत्नीसोबत वाद झाला होता, जी स्वतः एक न्यायिक अधिकारी आहे. तिची बहीण जम्मूमध्ये आयएएस अधिकारी आहे. रात्री पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले होते, ज्यामध्ये पत्नी ओरडत होती आणि अमन रडत होता, असा दावाही कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर अचानक शांतता पसरली.

 

जेव्हा वडिलांनी अमनला शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो खोलीत नव्हता. फोनची रिंग बाथरूममधून येत होती, मात्र वारंवार दरवाजा ठोठावूनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी खिडकीची काच फोडून पाहिले असता अमन ओढणीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

 

अधिकृत नोंदीनुसार, अमन शर्मा १९ जून २०२१ रोजी दिल्ली न्यायिक सेवेत रुजू झाले होते. पुणे येथील सिम्बायोसिस लॉ स्कूलमधून त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले होते. ऑक्टोबर २०२५ पासून ते कडकडडूमा न्यायालयात उत्तर-पूर्व जिल्ह्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे (DLSA) पूर्णवेळ सचिव म्हणून कार्यरत होते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

३० एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मदिना निमित्त कार्यक्रम 

३० एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मदिवसवर कार्यक्रम   टेकचंद्र शास्त्री: 9822550220   नागपुर। आज साठ …

क्या गाय का मांस खाने वाले लोग सुंअर का दूध पी सकते हैं?CM योगी का सवाल

क्या गाय का मांस खाने वाले लोग सुंअर का दूध पी सकते हैं?CM योगी का …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *