नवी दिल्ली: भारत आणि चीन या दोन्ही देशांत मोठा तणाव निर्माण झाला असून केंद्र सरकारने ५९ चिनी अॅप्सवर [ china apps] बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रसिद्ध टिकटॉक, यूसी ब्राऊझर, कॅम स्कॅनर यासारख्या प्रसिद्ध अॅपचा समावेश आहे.
भारतीय सुरक्षा एजन्सीने संबंधित अॅपची एक यादी केंद्र सरकारला पाठवून यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. तसेच, नागरिकांनीही आपल्या मोबाईलमधून काढून टाकावे, असे आवाहन केले होते. सदर अॅप भारतीय डेटा हॅक करू शकतात, असा इशारा दिला होता.
गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन यांच्यातील संबंध तणावग्रस्त राहिले आहेत. चिनी सैनिकांसोबत लडाखच्या गलवान खोºयात झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. या घटनेनंतर भारतात मोठा संताप व्यक्त केला गेला. देशभरातून चिनी मालांवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून चीनची नाकाबंदी करण्यासाठी सोशल मीडियावर सुद्धा जोरदार मागणी करण्यात येत आहे. केंद्र सरकारने आज संपूर्ण विचार करून ५९ चायनीज अॅपवर बंदी घातली आहे.
Check Also
मुसलमानों को भड़काकर आतंकी संगठन में भर्ती? NIA कोर्ट क्या है फैसला?
मुसलमानों को भड़काकर आतंकी संगठन में भर्ती टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट कोलकाता। मुसलमानों को …
नवंबर में भीषण गर्मी का वैज्ञानिक रहस्य
नवंबर में भीषण गर्मी का वैज्ञानिक रहस्य टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली …