नवी दिल्ली : पाकिस्तानच्या कराची येथील स्टॉक एक्स्चेंजच्या इमारतीवर सोमवारी दहशतवादी हल्ला झाला. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून अन्य तिघे जखमी झाले आहेत.
माहितीनुसार, साधारण: सकाळी १० वाजण्याच्या सुमारास चार दहशतवादी याठिकाणी आले. त्यांनी ग्रेनेड (हातबॉम्ब) फेकल्यानंतर इमारतीच्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस आणि सुरक्षारक्षकांनी त्यांना घेराव घातला. यानंतर दोन्ही बाजूंनी बराचवेळ गोळीबार सुरू होता. दोन दहशतवादी प्रवेशद्वारावरच ठार झाले. तर, दोघांनी इमारतीत घुसखोरी केली. मोठा घातपात करण्याआधी त्यांना ठार मारण्यात आले. हे सर्व दहशतवादी पोलिसांचा गणवेश परिधान करुन आले होते. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या घटनेनंतर स्टॉक एक्स्चेंजचा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. तसेच, कराचीतील सर्व रुग्णालयांना हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
हल्ल्यानंतर इमारतीत अडकलेल्या लोकांना मागील बाजूने बाहेर काढण्यात आले. सुरक्षा दलाने शेअर बाजार इमारत परिसर सील केला आहे. त्याशिवाय परिसरातील काही इमारतींवर स्नाइपर्सही तैनात केले आहेत.
Check Also
भारत न सोडणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांवर कोणती कारवाई होणार?
काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले उचण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग …
पहलगाम हमले के बाद पहली बार सुप्रीम कोर्ट ने उठाया बड़ा कदम
पहलगाम हमले के बाद पहली बार सुप्रीम कोर्ट ने उठाया बड़ा कदम टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …