वर्धा:-सचिन पोफळी-जिल्हा प्रतिनिधी:- दहेगाव गोसावी , तुळजापुर रेल्वे या गांवी बस सेवा सुरू करावी गावा शेजारी धपकी,चारमंडळ , जुनोना या गावाला वर्धा डेपोच्या बस सेवा सुरू आहे . तसेचं बोडसुला , हमदापुर सिंदी रेल्वे या गांवी हिंगणघाट डेपोच्या बस सेवा सुरू आहेत . परंतु आमच्या गांवाला दहेगांव गोसावी , तुळजापुर रेल्वे या गांवाला अजुन बस सेवा नाही आहे.वारंवारं बस सेवेची मागणी शुध्दा केली . कोरोना काळा मध्ये रेल्वे मार्ग बंद आहे तसेचं इत्तर सेवा शुध्दा बंद आहे आमच्या गांवातील व या गांवाच्या शेजारी असलेल्या गांवातील कामगार लोकांना वर्धा सेलु बुटीबोरी व नागपुर या ठिकाणी कामाला जातात.कामगारांना व इत्तर प्रवाशी लोकांना प्रवाश करण्याकरिता लवकरात लवकर बस सेवा सुरू करावी अश्या मागनीचे निवेदन विदर्भ राज्य आघाडीच्या वतीने एस.टी.बस प्रबंधक यांना देण्यात आले निवेदन देतेवेळी विदर्भ राज्य आघाडी जिल्हा सचिव आशिष इझनकर सेलू तालुका अध्यक्ष रामकिशोर सिंगणघुपे वर्धा शहर उपाध्यक्ष राहुल अतकरे जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत वाटकर स्वपनिल घुमे व तसेच सलून ब्युटी पार्लर असोसिएशन चे जिल्हाध्यक्ष लिलाधर येउलकर वर्धा तालुका सचिव नीलेश खरोडे विवेक अतकर यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यांत आले.
