वर्धा :- बुधवारी 209 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले, त्यामध्ये 10 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले आहे.तर आज एकूण 243 व्यक्तींंना आयसोलेशन मधून सुट्टी देण्यात आली.सध्या 437 लोक आयसोलेशन मध्ये दाखल आहेत.बुधवारी 209 नवीन स्वाँँब्स चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे.
आज आढळून आलेल्या दहा रुग्णांंमध्ये हिंगणघाटातील संत गोमाजी वॉर्ड येथील रहिवासी 60 वर्षीय पुरुष, वर्धा येथील सानेवाडी येथील 51 वर्षीय पुरुष, साईनगर येथील 40 वर्षीय पुरुष, नालवाडी येथील 27 वर्षीय तरूण, गजाननगरमधील 62 वर्षांचा पुरुष, कारंजा येथील 31,50 व 48 वर्षीय पुरुष तर आष्टी वार्ड न.5 येथील 26 वर्षीय युवक यांचा समावेश आहे.आणि सेलूमधील 36 वर्षांचा व्यक्तीचा समावेश आहे.
सध्या प्रलंबित 204 अहवाल येणे बाकी असल्याचे कळले.जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 732 वर पोहोचली आहे.बुधवारी, 30 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.आतापर्यंत एकूण 497 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.आज 61 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून. जिल्ह्यात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 217 ऍक्टिव्ह रुग्ण आहे.त्यांच्यावर उपचार सुरू आहे.