Breaking News

मोठी बातमी – रशियाने करोनावर बनवलेल्या लशीची तिसऱ्या टप्प्याची चाचणी भारतात होणार?

करोना व्हायरस विरोधात रशियाने विकसित केलेल्या ‘स्पुटनिक व्ही’ लशीच्या फेज एक आणि फेज दोनच्या क्लिनिकल चाचणीचा अहवाल ‘लॅन्सेट’ या प्रसिद्ध नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. ‘लॅन्सेट’ हे वैद्यकीय नियतकालिक आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वसामान्य जनतेला ‘स्पुटनिक व्ही’ लशीचे डोस देण्यास रशियन आरोग्य यंत्रणेने मंजुरी दिली आहे.

अत्यंत कमी जणांवर या लशीची चाचणी करुन अवघ्या दुसऱ्या फेजनंतर ‘स्पुटनिक व्ही’ लशीला मंजुरी दिल्यामुळे रशियाने बनवलेल्या या लशीच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.पण लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या फेज १ आणि २ च्या रिपोर्टनुसार ही लस मानवी वापरासाठी सुरक्षित आहे.

मागच्या काही दिवसांपासून ‘स्पुटनिक व्ही’ संदर्भात भारत सरकार आणि रशियामध्ये चर्चा सुरु होती. दरम्यान रशियाच्या संशोधन संस्थेने ‘स्पुटनिक व्ही’ लशीची सुरक्षितता आणि क्षमतेसंदर्भात व्यापक माहिती भारत सरकारला उपलब्ध करुन दिली आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.भारताने मॉस्को स्थित गमालेया रिसर्च इन्स्टियूटकडून या लशी संदर्भात माहिती मागितली होती. गमालेयाने ही लस विकसित केली आहे. पहिल्या दोन फेजमध्ये फक्त ७६ जणांवर या लशीची चाचणी घेण्यात आली. या मानवी चाचणीत सहभागी झालेल्या सर्वच स्वयंसेवकांच्या शरीरात मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याचे दिसून आले.

रशियाकडून उपलब्ध झालेल्या या व्यापक डाटाचे भारतीय तज्ज्ञांकडून विश्लेषण करण्यात येईल. भारतीय आरोग्य यंत्रणांकडून आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर लशीची फेज तीनची चाचणी घेण्याचा एक पर्याय उपलब्ध आहे असे सूत्रांनी सांगितले. सौदी अरेबिया, यूएई, ब्राझील आणि फिलीपाईन्स या देशांमध्ये ‘स्पुटनिक व्ही’ ची तिसऱ्या फेजची चाचणी घेण्याची रशियाची योजना आहे.

चाचणीच्या पहिल्या दोन टप्प्यात रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ ही लस सुरक्षित असल्याचे आढळले.‘स्पुटनिक व्ही’लस टोचल्यानंतर ४२ दिवसांनंतरही कोणतेही अन्य गंभीर परिणाम (साइड इफे क्ट्स) जाणवले नाहीत. त्याचप्रमाणे ही लस २१ दिवसांत शरीरामध्ये अ‍ॅण्टिबॉडी तयार करण्यास सक्षम आहे.‘लॅन्सेट’मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार दोन भाग असलेल्या लशीत दोन अडेनोव्हायरस वेक्टर्स आहेत. त्यामुळे एसएआरएस-सीओव्ही-२ स्पाइक प्रोटिनसाठी वेगळ्या पद्धतीने विकसित करण्यात आल्याचे म्हटले आहे.

अनेक अभ्यासातून ही लस सुरक्षित असल्याचे समोर आले होते. सध्या कोविड-१९ची लस वेक्टर्सचा वापर करून एसएआरसी-सीओव्ही -२ च्या स्पाइक प्रोटिनला लक्ष्य करतात. ऑक्सफर्डने जुलै महिन्यात केलेल्या चाचणीत लस सुरक्षित असल्याचे समोर आले होते. रशियाची चाचणी दोन रुग्णालयांमध्ये करण्यात आली त्यामध्ये १८ ते ६० वर्षे वयापर्यंतच्या निरोगी व्यक्तींचा समावेश होता. व्यक्तींची नोंदणी करण्यात आल्यानंतर त्यांचे विलगीकरण करण्यात आले होते.

 

 

About Vishwbharat

Check Also

*राज्यात कोरोना च्या चौथ्या लाटेचा धोका*

  सध्या कोरोनाच्या Omicron BA.2 व्हेरिएंटमुळे चीन आणि दक्षिण कोरियासह युरोप आणि आशियाच्या काही भागांमध्ये …

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*   चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *