वर्धा,जिल्हा प्रतिनिधी:- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव तसेच जिल्ह्यातील वाढणारी कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता, कोरोना रुग्णांना तात्काळ उपचार मिळण्याचे दृष्टिने, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी कस्तुरबा रुग्णालय, सेवाग्राम येथील 1आणि आचार्य विनोबा भावे सावंगी रुग्णालयातील 2 इमारती सर्व उपकरणे व सुविधांसह, अधिग्रहित केल्या आहेत.
जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात एकूण 1775 कोरोनाबाधित रुग्ण झाले असून ऍक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्ण 738 आहेत. त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूचे संसर्ग असल्यास त्यात अधिक वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. वर्धा जिल्ह्यात आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून, वाढत्या रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी कस्तुरबा रुग्णालय, सेवाग्राम यांची, नविन कोविड विभाग (ट्रामा सेंटर) ची इमारत व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांची शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी सेंटर, व ‘ब्लॉक सी’ ची इमारत अधिग्रहीत करण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम
३० (२४), ३४(क) तसेच कलम ६५(ख) (ग) अन्वये, कोविड वार्ड करीता इमारती व संपूर्ण उपकरणे उपलब्ध आवश्यक सुविधेसह पुढील आदेशापर्यंत अधिग्रहीत करण्यात आली आहेत.