Breaking News

कोरोना रुग्णांच्या वैद्यकीय देयकांच्या तपासणीसाठी समिती गठीत, रुग्णांच्या तक्रारीसाठी दोन्ही रुग्णालयात दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित

Advertisements

वर्धा: जिल्हा प्रतिनिधी:- कोरोना रुग्णांच्या वैद्यकीय देयकांमध्ये पारदर्शकता राहावी म्हणून कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम आणि विनोबा भावे रुग्णालय सावंगी येथे कोरोनाचा उपचार घेतलेल्या रुग्णांच्या देयकांची तपासणी करण्यासाठी  जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी तीन सदस्यीय समिती गठीत केली आहे. सदर समिती दर मंगळवारी दोन्ही रुग्णालयातील उपचार घेतलेल्या रुग्णाच्या देयकांची तपासणी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करतील.

Advertisements

जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असताना लोकांमध्ये अनेक गैरसमज पसरविले जात आहेत. तसेच रुग्णांकडून काही तक्रारी सुद्धा जिल्हा प्रशासनाला प्राप्त होत आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी तक्रार निवारण करण्यासाठी दोन्ही रुग्णालयात नोंदवही आणि तक्रार नोंदविण्यासाठी दूरध्वनी क्रमांक दिले आहेत. सेवाग्राम रुग्णालयात 07152- 284249 तर सावंगी रुग्णालयात 7350066930 या  क्रमांकावर नागरिकांनी सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत तक्रार नोंदवावी.

Advertisements

त्यासोबतच  कोरोना उपचार घेतलेल्या व घेत असलेल्या रुग्णांमध्ये रुग्णालय, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या बद्दल पारदर्शकता राहावी यासाठी  जिल्हाधिकारी यांनी रुग्णांच्या वैद्यकीय देयकांची तपासणी करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये  नायब तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे, पंचायत समिती, वर्धा. येथील सहाय्यक लेखाधिकारी  आशिष दहिवाडे, सुशिल राऊत  एनआरएचएम, जि.प. वर्धा. यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांना उपचार मिळण्यासाठी सेवाग्राम आणि सावंगी रुग्णालय अधिग्रहित करण्यात आले आहेत. या कोरोना रुग्णालयामध्ये प्रत्येक मंगळवारी सावंगी रुग्णालय सकाळचे सत्रात व सेवाग्राम रुग्णालय येथे दुपारचे सत्रात भेट देऊन वैद्यकीय देयकांची तपासणी करतील.

सदर समिती  रुग्णाचे प्रवेश पत्र, रुग्णाचे डिस्चार्ज कार्ड,रुग्णाच्या तपासणी बाबतचे प्रयोगशाळेचे एक्सरे/रक्त तपासणी / सीटी स्कॅन | इसीजी इ.

रुग्णालयाचा दैनिक खर्च प्रति रुग्ण खर्च अहवाल,

कोरोना अहवाल किंवा त्याबाबतचा तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे रेफरल स्लिप, इ. त्या संबंधीत रुग्णाचा झालेला खर्च इत्यादी कागदपत्रांची तपासणी करतील. तसेच याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येईल.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

रामनामाने नागपूर दुमदुमले, दीपोत्सव साजरा : अयोध्येत सकाळपासून भाविकांच्या रांगा

अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात रामलल्‍लाची काल सोमवार (२२ जानेवारी) रोजी प्राणप्रतिष्‍ठा करण्यात आली आहे. देशभरातील …

वनमंत्री मुनगंटीवार ने ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान के पास हवाई अड्डा बनाने का किया अनुरोध

वनमंत्री मुनगंटीवार ने ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान के पास हवाई अड्डा बनाने का किया अनुरोध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *