Breaking News

सप्टेंबर महिन्याचे शिधावस्तु वितरण जाहिर

वर्धा जिल्हा प्रतिनिधी : -राष्ट्रीय अन्न  सुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना सप्टेंबर महिन्याचे  अन्न धान्य वितरण जाहिर करण्यात  आले आहे.

            प्राधान्य कुंटूंबातील लाभार्थ्यांना  गहू प्रति व्यक्ती  3 किलो 2 रुपये दराने, तांदूळ प्रति व्यक्ती 2 किलो 3 रुपये दराने, अंत्योदय योजना गहू प्रति शिधापत्रिका 15 किलो, तांदूळ प्रति शिधापत्रिका 20 किलो. एपीएल शेतकरी योजना गहू प्रति व्यक्ती 3 किलो, तांदूळ  प्रति व्यक्ती  2 किलो. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत प्रति व्यक्ती गहु 2  तांदूळ 3  किलो  व प्रति शिधापत्रिका 1 किलो चनादाळ मोफत पुरविण्यात  येणार आहे. साखर फक्त अंत्योदय योजना प्रति शिधापत्रिका 1 किलो प्रमाणे किंवा साठा  उपलब्धतेनुसार 20 रुपये दराने देय राहील.

            केरोसिन मिळण्यास पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रति 1 व्यक्ती 2 लिटर , 2 व्यक्ती  3 लिटर व 3 व्यक्ती वरील केरोसिन मिळण्‍यास पात्र शिधापत्रिका 4 लिटर याप्रमाणे देय राहील. गॅस सिलेंडर धारकांना केरोसिन देय राहणार नाही. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुंटूंब लाभार्थ्यांना  तुरदाळ 55 रुपये प्रति किलो दराने  व चनादाळ 45 रुपये प्रति किलो दराने धारकांच्या मागणी प्रमाणे उपलब्धतेनुसार  1 किलो  प्रमाणे . वितरण करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपूरकर रसिकांना दोन दिवसीय नाट्य मेजवानी

शुक्रवारपासून महावितरणची राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा नागपूर, दि. 6 जुलै 2024:- महावितरणच्या आंतर प्रादेशिक विभाग राज्य नाट्य स्पर्धा नागपूर परिमंडलाच्या यजमान …

दहा लाखाच्या संत्र्यावर शेतकऱ्याने फिरविला जेसीबी

विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडले आहेत.उत्पादन खर्च अधिक व कमी नफा मिळत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *