Breaking News

सी.सी.आय. व्दारे वर्धा जिल्हयात जास्तीत जास्त कापुस खरेदी केन्द्र सुरु करण्यात यावे – खासदार रामदास तडस

केन्द्रीय मंत्री श्रीमती स्मृती इरानी यांच्याकडे वर्धा जिल्हयात जास्तीत जास्त कापुस खरेदी केन्द्र देण्याची मागणी करणार

वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- वर्धा कृषि उत्पन्न बाजार समिती, वर्धा अंतर्गत सन 2020-2021 करिता वर्धा जिल्हयाने सी. सी. आय. मार्फत सर्वप्रथम विदर्भात नोंदणीकृत शेतक-यांचा कापूस खरेदी केला. मागील हंगामात सी. सी. आय. ने वर्धा बाजार समिती अंतर्गत नोंदणी केलेल्या संपुर्ण शेतक-यांचा कापूस हमी भावात खरेदी केला. मागील महिण्यात सी. सी. आय. अकोला मार्फत कापूस खरेदी केन्द्राकरिता टेंडर नोटीस काढले असता त्यामध्ये आर्वी, देवळी, हिंगणघाट, कांढळी व सेलू या ठिकाणी कापूस खरेदी केन्द्र देण्यात आले परंतु वर्धा तालुक्यात एकही खरेदी केन्द्र देण्यात आलेले नसल्यामुळे वर्धा तालुक्यातील शेतक-यांना हमीभावात कापूस विक्रिसाठी अडचण निर्माण होत आहे. खासदार रामदास तडस यांच्याकडे सीसीआय व्दारा वर्धा कृषि उत्पन्न बाजार समिती, वर्धा अंतर्गत सी. सी. आय. मार्फत शेतक-यांचा कापूस खरेदीसाठी केन्द्र मिळण्याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. शाम कार्लेकर, शेतकरी नेते श्री. प्रशांत इंगळे तिगांवकर, संचालक श्री. दत्ता महाजन, संचालक गंगाधर डाखोळे यांनी मागणी केली.

      कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागणीच्या अनुसरुन खासदार रामदास तडस यांनी महाव्यवस्थापक भारतीय कपास निगम लिमिटेड यांच्याकडे खरेदी सी.सी.आय. व्दारे वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा अंतर्गत शेतक-यांचा कापूस खरेदी केन्द्र देण्याकरिता वर्धा तालुक्याचा समावेश करण्याबाबत पत्र पाठवीले आहे. तसेच केन्द्रीय मंत्री श्रीमती स्मृती इरानी यांच्याकडे  वर्धा जिल्हयात जास्तीत जास्त कापुस खरेदी केन्द्र देण्याची मागणी करणार असल्याचे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.

      वर्धा जिल्हयात सोयाबीन पिकासोबत कापसाची लागवड जास्त प्रमाणात होत असतात, कापुस खरेदी केन्द्र आर्वी, देवळी, हिंगणघाट, कांढळी व सेलू हे सीसीआय व्दारे प्रस्तावीत करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे वर्धा तालुक्यात सुध्दा कापुस खरेदी केन्द्र सुरु केल्यास वर्धा तालुक्यातील कापुस उत्पादक शेतक-यांना दिलासा मिळेल असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी यावेळी व्यक्त केला.

About Vishwbharat

Check Also

महोगनी पेड लगाओ और 12 साल बाद मुनाफा ही मुनाफा कमाओ

महोगनी पेड लगाओ और 12 साल बाद मुनाफा ही मुनाफा कमाओ टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांचा विधवा लाडक्या बहिणीला आर्थिक मदतीचा हात

माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांचा विधवा लाडक्या बहिणीला आर्थिक मदतीचा हात ब्रम्हपूरी:6आगष्ट गेल्या काही महिन्यापूर्वी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *