Breaking News

जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश !

  • माजी खासदार नरेश पुगलिया व इतर दोघांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका !

चंद्रपूर महानगरपालिका, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांना नोटीस !

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विविध आरोग्य सुविधांचा अभाव व अन्य अनेक समस्या असल्यामुळे कोरोना रुग्णां
चे हाल होत आहेत, असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. माजी खासदार नरेश पुगलिया व इ
तर दोघांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती द्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानं

 

तर न्यायालयाने केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, राज्याच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रधान सचिव, केंद्रीय ड्रग्ज स्टैंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन, चंद्रपूर महानगरपालिका, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांना नोटीस बजावून दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांसाठी आवश्यक खाटा व कोरोना रुग्णालये उपलब्ध नाहीत. जिल्ह्यात जीवनरक्षक औषधांचा तुटवडा आहे. कोरोना चाचणी सुविधा अपुऱ्या आहेत. चाचणीचे निदानही अचूक येत नाही, असे अनेक आरोप या याचिकेत करण्यात आले आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपूरकर रसिकांना दोन दिवसीय नाट्य मेजवानी

शुक्रवारपासून महावितरणची राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा नागपूर, दि. 6 जुलै 2024:- महावितरणच्या आंतर प्रादेशिक विभाग राज्य नाट्य स्पर्धा नागपूर परिमंडलाच्या यजमान …

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *