Breaking News

वरोरा विधानसभेत युवक काँग्रेसच्या नव्या नियुक्त्या

Advertisements
▪विधानसभा अध्यक्षपदी शुभम चीमुरकर
▪तालुका अध्यक्ष दडमल तर  
      शहराध्यक्षपदी लोहकरे.
वरोरा_
अखिल भारतीय युवक कॉंग्रेसच्या वरोरा  विधानसभा अध्यक्षपदी शुभम चिमुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हरीश कोत्तावार यांनी केली असून, नियुक्तीचे पत्र खा.बाळूभाऊ धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते देन्यात आले. वरोरा तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी देवेंद्र दडमल (खेमजई) यांची नियुक्ति करण्यात आली आहे.
        वरोरा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश शांताराम लोहकरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून त्यांना  शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. सर्व नियुक्त्या प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या  मान्यतेने जिल्हाध्यक्ष हरिष कोत्तावार  यांनी केली आहे.काँग्रेस पक्षाचे विचार सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने व संघटन मजबूत करण्याचे दृष्टीने नवनियुक्त पदाधिकारी प्रयत्न करतील असा विश्वास खा.बाळूभाऊ धानोरकर आ. प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला माजी नगराध्यक्ष विलास टिपले, तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर,कृषी उत्पन्न  बाजार समितीचे सभापती राजेंद्र चिकटे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले .
Advertisements

About Vishwbharat

Check Also

झाडावर उलटे टांगून माकडावर अत्याचार : कारवाईची मागणी

माकड हा मानवाचा पूर्वज असल्याचा दाखला दिला जातोय. तसेच अनेकदा माकडांच्या मर्कटलिलांना मनुष्यप्राणी वैतागतात. मात्र …

विदर्भात १० ते १४ फेब्रुवारीपर्यंत पावसाचा अंदाज

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामानाचा कोणताही निश्चित अंदाज देणे आता कठीण झाले आहे. पावसाळ्यासाठी कोणताही एक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *