Breaking News

जनविकास सेनेतर्फे ‘दंडा लेकर हल्लाबोल’,आंदोलनकर्ते व पोलिसांत धक्काबुक्की

संतप्त कामगारांनी या महाविद्यालयाच्या काचा फोडून आपला रोष व्यक्त केला.

चंद्रपूर-
कंत्राटी आरोग्य कर्मचार्‍यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी जनविकास सेनेच्या नेतृत्वात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर ‘दंडा लेकर हल्लाबोल’ आंदोलन केले गेले. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. तेथेे आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. शेवटी संतप्त कामगारांनी या महाविद्यालयाच्या काचा फोडून आपला रोष व्यक्त केला.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत कंत्राटी आरोग्य कर्मचार्‍यांचे मागील सात महिन्यांपासून पगार थकित आहे. शिवाय किमान वेतन लागू केले गेले नाही. या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील पाऊण महिन्यांपासून डेरा आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. तडजोडीचा प्रयत्न केला. पण दिलेली मुदत उलटली आणि अद्याप पगार न झाल्याने कामगारांत असंतोष पसरला. शुक्रवारी आंदोलनास्थळापासून सर्व कामगार हातात दंडे व दंड्याला झाडू बांधून शासकीय महाविद्यालयाच्या दिशेने रवाना झाले. त्यांना अडविले गेल्याने कामगार संतप्त झाले. त्यांनी महाविद्यालयात तोडफोड केली. काही काळ तेथे तणाव निर्माण झाला होता. या आंदोलनाची दखल न घेतल्यास अधिष्ठाता कार्यालयाप्रमाणे प्रत्येक शासकीय विभागात ‘दंडा लेकर हल्लाबोल’ आंदोलन करू, असा इशारा पप्पू देशमुख यांनी दिला आहे.

About Vishwbharat

Check Also

दहा लाखाच्या संत्र्यावर शेतकऱ्याने फिरविला जेसीबी

विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडले आहेत.उत्पादन खर्च अधिक व कमी नफा मिळत आहे. …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *