काही व्यक्ती आपल्या स्वत:च्या जिद्दीने आकाशाला गवसणी घालू पाहतात त्यांची इच्छाशक्ती प्रचंड असते असे वारंवार आपल्या बोलण्यात येते , आणि ते सत्य आहेच ! ज्यांचा आत्मविस्वास स्वत:वर आहे ते कोणत्याही क्षेत्रात आपला ठसा उमटविल्या शिवाय स्वस्थ असूच शकत नाही . आपल्या कल्पक विचारांनी ते इतरांना सुद्धा प्रेरणादायी असतात, या माझ्या तर्क बुद्धीला पुरुष अथवा स्त्री असे बंधन नाहीच. सृष्टीने मानव ही शाश्वत निर्मिती केली त्यात दोन जाती निर्माण केल्या स्त्री आणि पुरुष , चराचरात ह्या दोनच जाती आपल्याला पहावयास मिळतात, दोघांनाही सारखी समानता तरी आपण महिलांना कमी समजून झुकते माप देतो कारण आपण तिला आधीपासून अबला हि उपाधी बहाल केली , मग त्या हि आपण अबला समजून समाजात आपली भूमिका तितकीच समजून कार्य करू लागल्या तसे असले तरी आज जगाच्या पाठीवर महिलांनी आपली भूमिका व आपली प्रतिमा अबला नसून सबला असल्याचे सिद्ध केले हे पुरुष प्रधान संस्कृतीत मान्य करावे लागेलच .
८ मार्च हा महिला दिन , महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढयाच्या सन्मानार्थ जगाच्या नकाश्यावर असणाऱ्या देशात हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो . महिला दिन साजरा होत असतांना ज्या महिलेंनी आपल्या दैनंदिन चाकोरीतून बाहेर पडत आपल्या शिक्षणाचा उपयोग तळागाळा पर्यत व्हावा ह्या हेतून कार्य केले त्या आदी शिक्षिका सावित्रीबाई , डॉ. आनंदीबाई याचा उल्लेख मला करावासा वाटतो , आज ज्या महिला त्यांचा वसा समोर नेऊन कार्य करत आहे त्या सावित्रीच्या लेकी यांची भूमिका खूप मोठी आहे , वैद्यकीय, क्रीडा ,कला, समाजकारण, राजकारण संशोधन, ज्या ज्या क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी होती अश्या सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाची मोहर उमटवित आज कार्य करीत आहेत . अश्याच एका एका लहानश्या नगरातून आपले शालेय शिक्षण पूर्ण करून सहाय्यक शिक्षिका ते वरिष्ठ अधिव्याख्याता तथा उपविभाग प्रमुख प्रसार माध्यम विभाग रा.शै.संशोधन व प्रशिक्षण परिषद , पुणे . या पदावर आपल्या ज्ञानाचा उपयोग करीत स्व: बळावर आपले कार्य हेच आपली सेवा या हेतूने कार्य करीत आहेत त्या डॉ. किरण धांडे . सहाय्यक शिक्षिका म्हणून वर्धा जिल्हा परिषद मध्ये रुजू होऊन एका लहानश्या गावात मुलांना शिक्षण देण्याचे कार्य करीत असतांनाच त्याचा मनात आपल्या शिक्षणाचा उपयोग फक्त मर्यादित न ठेवता सर्वसामान्य मुलांन पर्यंत व्हावा त्यांच्यासाठी काहीतरी करावे हा हेतू , पण हे सार करण्यासाठी व तिथपर्यंत पोहोचविण्यासाठी एखाद्या पदावर असेन महत्वाचे आहे साधा शिक्षकी पेशात राहून हे काम करता येणार नाही त्या पदाला काही मर्यादा आहे व आपला हा विचर कोणता अधिकारी अमलात आणेल ,पदाधिकारी सुद्धा हा विचार उचलून धरणार नाही हा विचार मनात येताच त्यांनी स्वताचा कृतीत उतरवत किमान तीन वर्षात शालेय कार्य सांभाळत शिक्षणक्षेत्र आपले कार्यक्षेत्र मानून डॉक्टरेट (Ph.D.(Education,Learning Disability ) हि पदवी संपादन केली. वरिष्ठ अधिव्याख्याता या पदावर वर्धा येथेच जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था येथे रुजू झाल्यात. या काळात त्यांनी आपल्या कार्यकुशालतेने लोकाभिमुख होत शिक्षण क्षेत्रात जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध प्रशिक्षणे, कार्यशाळा आयोजित करून शिक्षक बांधवाना मार्गदर्शन केले. वरिष्ठ अधिव्याख्याता ते प्रभारी प्राचार्य हि भरारी साधी – सोपी नाही , शालेय स्तरावर विवध समस्या आहेत त्याचा अभ्यास करीत त्या कश्या सोडवता येईल यावर शिक्षकांशी चर्चा विचार विनिमय करीत त्या सोडविण्याचा प्रयत्न्न केलाच , सोबत शासन स्तरावरून येणाऱ्या विविध स्पर्धा , योजना यशस्वी राबविल्या. महिला ह्या राजकारणात किवा समाजकारणात पुढे असेल तर आपोआप त्याचे कार्य जनमानसात जाते पण काही क्षेत्र हे त्याला अपवाद आहे. तुमच्या कार्याची दाखल काही क्षेत्रात फक्त मर्यादित झाली असते. तिथे तुमचा परिचय फक्त एक चांगला अधिकारी म्हणून होत असतो , सिंधूताई सपकाळ याचे एक वाक्य खूप काही सांगून जाते, “ बेटा भाषण नाही तर राशन नाही , “ या समाजात जगतांना माझी शिदोरी हे माझे भाषणच तर होते म्हणून मला या समाजातील ज्यांचे कुणी नाही त्याच्यासाठी कार्य करता आले, माझे भाषण त्यांचे राशन झाले. खरच आहे . ! आणि याची विरुद्ध बाजू म्हणजे अधिकारी , हा भाषण न देता आपल्या कार्यांनी लोकाभिमुख होत असतो. डॉ. किरण धांडेच्या बाबतीत एक सक्षम अधिकारी म्हणून पहिल्या गेले त्यामुळेच त्यांना सदस्य शिक्षणशास्त्र अभ्यास मंडळ गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती ते राज्य शिक्षक पुरस्कार निवड समिती सदस्या या वेगवेगळ्या पदावर काम करण्यास त्यांची वर्णी लागली. डॉ. धांडे ह्या सहय्यक शिक्षिका त्यामुळे त्यांच्यातील कवी , लेखिका सुद्धा सृजनात्मक ! आपले कार्य पार पाडत असतांना त्यांनी लेखन सुद्धा केलेत यात लोकमत वृत्तपत्रात “ प्रयोगशील शाळा “ या विषयावर सातात्यांनी लेखन करून जे शिक्षक जीव ओतून विद्यार्थी आणि शाळा जीवापाड जपतात अश्या शिक्षकांचे कार्य जनमानसात पोहचविण्याचा त्या दुवा झाल्यात, सोबतच जीवन शिक्षण मासिक जे शिक्षण क्षेत्राचे मुखपृष्ठ आहे त्यात विविध कविता व लेख प्रकाशित झालेत . नवी पाहाट, शिक्षणाच्या नव्या वाटा अश्या दर्जेदार पुस्तकांचे लेखन केले. आपल्या या बहुयायामी व्यक्तिमत्व व हसतमुख स्वभावामुळे लोकांना धांडेचे कार्य म्हणजे आपले कार्य समजून ती पार पडली. यात एक महत्वाचे कार्य म्हणजे वर्धा जिल्यात झालेली शिक्षणांची वारी, राज्यस्तरावरून जेव्हा वारी अयोजानाबाबतचे पत्र प्राप्त झाले तेव्हा समन्वय सभा डॉ धांडेच्या मार्गदर्शनात आयोजित केल्या गेली , त्यांनी पत्राचे वाचन करून आपली भूमिका विषद केली ,पुढचे काम हे समन्वयाने होणार होते, त्या सभेत ठरल्याप्रमाणे विभागावर नियोजन करून आपआपली भूमिका सांगण्यात आली सर्वाना कामाची वाटणी करण्यात आली, आपल्याला दिलेले कार्य हि माझी जबाबदारी समजून सर्वांनी सोहळा कसा दिमाखदार पार पडता येईल याकडे जातीचे लक्ष दिले. आणि तो कार्यक्रम यशस्वपणे पार पडला , वारीला येणारा प्रत्यक साधक या ठिकाणी येऊन ज्ञानासोबत एका उत्कृठ आयोजनाची प्रचीती येत आहे असा शेरा देऊन जात होता . वारीच्या काळात जे संभाषण , विचार आणि वेळेवर येणारे आव्हाणे यशस्वीपणे पार करत वारी संपन्न झाली . एक अधिकारी म्हणून कुठली चिडचिड नाही की हेवेदावे नाही. दिवसभर शिक्षण वारीला भेट देणाऱ्या पाहुण्याचे स्वागत वरिष्ठ अधिकाऱ्यांची व राजकीय पुढार्यांची सूचनांचे स्वागत करत शेवटी रात्रीचे जेवण व निवास व्यवस्था जातीने लक्ष घालून त्यांची पाहणी करूनच त्या घरी परतायच्या या कार्याची दाखल कुणी घेतली असेल , नसेल पण त्यांच्या या स्वभावामुळेच त्या लोकाभिमुख होत गेल्या. त्याचे वर्धेतील कार्य असो व गोंदिया जिल्याला मिळालेली काही काळापुरती पोस्टिंग असो त्या काळात त्यांनी आपल्या कर्तव्यदक्ष सक्षम भूमिकेतून एक अधिकारी म्हणून त्या पार पाडत गेल्या , चांगल्या मनात चांगले विचार हे सतत येत असतात. आपल्याला समाजाचे काहीतरी देणे लागते हा उद्दात हेतू ठेऊन काही शालेय विद्यार्थ्यांचा त्याच्या गुणात्मक , तुलनात्मक अभ्यास करून अहवाल पुस्तिका सुद्धा तयार केल्या त्यात फुले फुलतांना ऐसी , अक्षरे मेळवीन ,जाऊ आनंदाच्या गावा , तुझा मी सांगती , अपूर्वाई , सृजन, या प्रकारचे लेखन करून पुस्तक रुपात विद्यार्थ्यांनच्या समस्यांचे निराकरण करण्याचे काम अश्या लेखनातून झाले त्याचा उपयोग त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना पुढील काळात नक्कीच होईल . प्रत्येक यशस्वी पुरूषांमागे महिलेचा हात असतो अस म्हटले जाते पण प्रत्येक यशस्वी स्त्री मागे पुरूषच असेल असे नाही ती स्वबळावर आपले हक्क जाणीव निर्माण करू शकते. आजच्या या महिला दिनाच्या निमात्ताने सर्व आपल्या क्षेत्रात कार्यरत यशस्वी महिलांचे अभिनंदन.
लेखन व शब्दांकन
दीपक गुढेकर वर्धा