वर्धा :- मुंबई दौरा आटोपून हिंगणघाट शहरात येताच आमदार समीर कुणावार यांनी तहसील कार्यालय हिंगणघाट येथे उपविभागीय अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा, तहसीलदार हिंगणघाट, ठाणेदार पोलिस स्टेशन हिंगणघाट व इतर विभागातील अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पूरपरिस्थितीचा आढावा घेतला तसेच मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नियोजित पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री किशोरभाऊ दिघे , माजी नगराध्यक्ष प्रेमबाबू बंसतानी भाजयुमो प्रदेश सचिव अंकुश ठाकुर माजी नगरसेवक चंदूभाऊ मावळे शहराध्यक्ष आशिष पर्बत भाजयुमो शहराध्यक्ष सोनू पांडे सुनील डोंगरे, तुषार येणोरकर,राहूल दारूणकर,गौरव तांबोळी, गणेश धकाते, राहुल नवघरे, स्वप्नील शर्मा, आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार समीर कुणावर यांनी घेतला तालुक्यातील पूर परिस्थितीचा आढावा
Advertisements
Advertisements
Advertisements