Breaking News

अधिकाऱ्यांच्या जंबो बदल्यांचा आठवडा! मोहन कारेमोरेंची पारदर्शकतेची मागणी

Advertisements

नागपूर : महसूल, परिवहन, वन, सिंचन, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, गृह विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या या आठवड्यात होणार आहेत. मात्र, यात होणारा गैरव्यवहार थांबवावा, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी केली आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात काम केल्यानंतरही काही सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर अन्याय झालेला आहे. काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीला एक-दोन वर्ष शिल्लक असूनही घराजवळ नोकरीचे स्वप्न हवेत विरले आहे. काहींनी आर्थिक खेळी खेळत बदल्यांचा सपाटा सुरु केला आहे. यात पारदर्शक आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची दूरवर बदली केली जाते. तर, मलाई देण्याऱ्या अधिकाऱ्यांना आवडीच्या ठिकाणी नेमले जाते. यात कोट्यवधीचा व्यवहार केला जात आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात पैसा घेतला जातो. या बदल्यांमध्ये पारदर्शकता महत्त्वाची असून पैशाचा होणारा दुरपयोग रोखावा, अशी मागणी कारेमोरे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदनातमार्फत केली आहे.
……………….
*महसूलवर डोळा*

Advertisements

महसूल विभागातील तहसीलदार, उपजिल्हाधिकारी पदासाठी मोक्याच्या ठिकाणी बदली व्हावी, यासाठी काही मंत्र्यांच्या भेटीगाटी अधिकाऱ्यांनी घेतल्याचे कळते. तर, काहींनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे काही आमदारांनी शिफारस पत्र दिले आहे. यात काय होणार, हे चित्र या आठवड्यात स्पष्ट होईल.
……….
*नागपूरकडे लक्ष*

Advertisements

बऱ्याच वर्षानंतर नागपूरला कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या रूपाने मिळाले आहेत. या बदल्यांमधील सावळागोंधळ दूर करतील काय? असा प्रश्न आहे.नागपूर जिल्ह्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार पदावरील काही अधिकारी एकाच ठिकाणी तीन वर्षांहून जास्त झाल्यास फक्त टेबल बदलवितात. हीच परंपरा असेल की मोडणार? अशीही चर्चा आहे.नागपूर जिल्हाधिकारी याकडे लक्ष देतील काय? असा सवाल कारेमोरे यांनी उपस्थित केला आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

पूर्व मंत्री पंकजा मुंडे की बीजेपी को धमकी?

मुझे उम्मीदवारी टिकट मिलना ही चाहिए: अन्यथा अच्छा नहीं होगा? पूर्व मंत्री पंकजा मुंडे का …

राजस्व अधिकारियों और रेत माफियाओं की सांठ-गांठ से अरबों खरबों की रायल्टी चोरी?

राजस्व अधिकारियों और रेत माफियाओं की सांठ-गांठ से अरबों खरबों की रायल्टी चोरी? टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *