वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण
वर्धा : आज दिणांक 15 जुलै रोजी वर्धा आरपीएफने दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडेआठच्या सुमारास वर्धा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वर एक्सप्रेस गाडी चालत असतांना एक इसम चालत्या गाडीमध्ये चढत असतांना तो रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडला त्यावेळेस सदर प्लॅटफॉर्मवर ड्युटीवर असलेले आरपीएफ उपनिरीक्षक एस,डी,डिगोले यांचे लक्ष जाताच त्यांनी धाव घेत सदर युवकाला बाहेर खेचले यावेळी आरपीएफ महिला कर्मचारी सुशीला वायाम त्यांच्या मदतीला धावून आल्या यावेळी त्या दोघांनी मिळुन सदर इसमाचे प्राण वाचवले,सदर घटना इतकी थरारक होती की तेथे उपस्थित प्रवाशांचे बंभेरे उडाले,सदर घटनेत युवकाला साधारण खरचटलते असून,सदर युवकास प्राथमिक उपचार देण्यात आला,सदर युवकाचे नाव अनिल सीताराम तुमसरे वय 29 वर्ष असून तो गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील रहिवासी असल्याचे त्याने सांगितले,सदर घटनेची माहिती वरिष्ठांना देण्यात आली,सदर युवकाने सदर जीव वाचवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले,यावेळी तेथे उपस्थित नागरिकांनी आरपीएफ उपनिरीक्षक एस,डी,डिगोले व महिला आरपीएफ कर्मचारी सुशीला वायाम यांचे आभार मानत कौतुक केले,