वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी मेघे येथे महिला उद्योजकता वाढविण्याच्या उद्देशाने उद्योजक संस्कृती, सुरुवात आणि संधी याबाबत तीन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेत पहिल्या दिवशी शरद पवार दंत महाविद्यालयातील बालदंतशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नीलिमा ठोसर यांनी प्रकल्पाची विस्तृत माहिती देत आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्रियांनी औद्योगिक क्षेत्रात सहभाग वाढविण्याबाबत विद्यार्थिनींशी प्रेरक संवाद साधला. दुसऱ्या दिवशी ओरल डायग्नोसिस अँड रेडिओलॉजी विभागातील डॉ. मृणाल मेश्राम यांनी यशस्वी उद्योजकतेची कल्पकता या विषयावर तर तिसऱ्या दिवशी डॉ. पुनीत फुलझेले यांनी उद्योजकतेकरिता पूर्वतयारी आणि संधींची उपलब्धता याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत प्रत्यक्ष तसेच आभासी माध्यमाद्वारे मोठ्या संख्येने सहभागी होत विद्यार्थिनींनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.