वर्धा लोकसभा क्षेत्रात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी व नागरिकांना आर्थिक मदत करावी,
उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांच्याकडे खासदार रामदास तडस यांची मागणी
वर्धाः मागील काही दिवसापासून वर्धा लोकसभा क्षेत्रात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. दुदैवाने या दरम्यान अनेक व्यक्तींचा पुर परिस्थीती व विजे पडल्यामुळे मृत्यु झाल्याची घटना घडलेल्या आहे. दुर्घटनेत मृत पावलेल्या अथवा गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींच्या परिवाराला तातडीने मदत मिळावी याकरिता प्राधान्याने मदत मिळणे आवश्यक आहे. या सोबतच अतिवृष्टीमुळे सर्वत्र शेतीचे नुकसान मोठया प्रमाणावर झाल्याचे दिसुन येत आहे. ग्रामीण व शहरी भागातील अनेकांची राहते घरी पुरपरिस्थीती व सततच्या पावसामुळे क्षतीग्रस्त झाल्याच्या घटना देखील घडलेल्या आहे, सोबतच पाळीव जनावरांचीसुध्दा जिवीत हाणी झालेली आहे. त्यामुळे वर्धा लोकसभा क्षेत्रातील नागरिक व शेतकरी संकटात सापडलेला आहे. अश्या परिस्थीतीत वर्धा जिल्हयाला राज्यशासनाच्या माध्यमातुन ओला दुष्काळ जाहीर करुन शेतक-यांना व नागरिकांना आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. शेतक-यांना व नागरिकांना मदत मिळण्याच्या दृष्टीकोनातुन राज्यशासनाच्या माध्यमातुन ओला दुष्काळ जाहीर करुन वर्धा लोकसभा क्षेत्रातील नागरिकांना व शेतक-यांना आर्थिक मदत देण्याकरिता सहकार्य करण्यावी मागणी आज मुंबई येथे उप मुख्यमंत्री मा. श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांची भेट घेऊन खासदार रामदास तडस यांनी विनंती केली.
यावेळी उप मुख्यमंत्री मा. श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांच्याकडे खासदार रामदास तडस यांनी वर्धा जिल्हयातील नुकसानीबाबतचा दिनांक 14 जुलै 2022 पर्यंतचा संपुर्ण अहवाल सादर केला व सर्व विषयावर सविस्तर सकारात्मक चर्चा केली, तसेच आपल्या अध्यक्षतेखाली वर्धा जिल्हयाची प्रशासकीय बैठक आयोजीत करण्याबाबत विनंती केली. राज्यसरकार जनतेच्या पाठीशी असुन लवकरात लवकर बैठक घेऊन जिल्हयातील परिस्थीतीला अनुसरुन ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत प्रयत्न करणार, तसेच शेतक-या व नागरिकांना शासनाकडून मदत मिळणे गरजेचं आहे, यासाठी नुकसान ग्रस्तांना सर्व प्रकारची मदत व आवश्यक साहाय्य केले जाईल असे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांनी आश्वस्त केले.
वर्धा जिल्हयात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी भेटी दिल्या, परिस्थीती प्रत्यक्ष अनुभवली तसेच वर्धा जिल्हयातील प्रत्येक तालुक्यामधील अनेक गावामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे, घरांचे नुकसान झाले, तसेच जिवीत हाणी सुध्दा झालेली आहे. वर्धा जिल्हाधिकारी यांनी दिलेला संपुर्ण अहवाल उप मुख्यमंत्री मा. श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांची भेट घेऊन सादर केलेला आहे, राज्यशासन यावर निश्चीत सकारात्मक विचार करुन शेतकरी व नागरिकांना आर्थिक मदत करेल असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी यावेळी व्यक्त केला.