Advertisements
कोरपना(ता.प्र.):-
बसच्या प्रतिक्षेत असलेले खेड्या पाड्यातील प्रवाशांना क्षणाची विश्रांती मिळावी यासाठी ही मंडळी प्रवासी निवाऱ्याचा आसरा घेतात.मात्र ज्याठिकाणी याची सुविधा उपलब्ध नसेल तर लोकांना कशाप्रकारे त्रासाला सामोरे जावे लागते याची कल्पनाच करवे ना.अशीच काहीशी परिस्थिती सध्या कोरपना तालुक्यात पहायला मिळत आहे.याविषयी पाहणीसाठी जर राजूरा पासून सुरूवात केली तर कोरपना तालुक्यातील शेवटच्या टोकापर्यंतच्या गावातील कित्येक प्रवासी निवारे उद्ध्वस्त झालेले दिसून येतात.कित्येक ठिकाणी छप्पर गायब झाले निव्वळ शोभेच्या भिंती उभ्या असून कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले तर काही जमीनदोस्त होऊन अक्षरशः नामशेष झाल्याचे पहायला मिळते.याक्षेत्रात जर अ
शी परिस्थिती असेल तर संपूर्ण राजूरा विधानसभा क्षेत्रात काय असेल याची कल्पनाच न केलेली बरी.”प्रवासी निवारे उद्ध्वस्त,लोकप्रतिनीधी मात्र बिनधास्त” अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.

प्रवासी निवारे अस्तित्वात नसल्याने पावसाळ्यात पाणी,उन्हाळ्यात उन्हात उभे राहून बसची वाट पहावी लागत असल्याने लहानमोठे शालेय विद्यार्थी,महिला,पुरूष प्रवाशांना मोठ्याप्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे.नाईलाजस्तव यांना झाडाचा आधार घ्यावा लागत असल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.प्रवासी निवारा हा जनतेच्या इतर जीवनावश्यक गरजे पैकी एक असून लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर ही समस्या मार्गी लावावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.आता समस्याचे निवारण केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Advertisements