Advertisements
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व कृषी विभाग यांच्या माध्यमातून संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार सुरू
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व कृषी विभाग यांच्या माध्यमातून तहसिल, कृषी व पंचायत समिती या शासकीय कार्यालयाच्या अवरामध्ये मा. मुख्यमंत्री यांच्या विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारीत संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार सुरू करण्यात आले.या बाजाराचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी कु अश्विनी कुंभार यांनी केले.त्यांच्या हस्ते महिलांना महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व महिंद्रा यांच्या माध्यमातून देण्यात येणारे परसबाग बियाणे किट वाटप करण्यात आले.यामधे थेट शेतकरी ते ग्राहक स्वच्छ, ताजा व विषमुक्त भाजीपाला विक्री केंद्र धैर्यता स्वयंसहाय्यता गट पाळसगाव या महिलांनी सुरू केले.त्याचबरोबर यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले प्रोडॉक्ट विक्रीसाठी ठेवण्यात आले.या उपक्रमाला सर्वच शासकीय कार्यालयातुन मोठा प्रतिसाद मिळाला.*
यावेळी तालुका कृषी अधिकारी कु अर्चना कुंभार, जिल्हा कार्यकारी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान प्रवीण कुर्हे,मंडळ कृषी अधिकारी वायसे, तालुका समन्वयक महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानचे सचिन निकम ,धैर्यता स्वयंसहाय्यता बचत गटातील महिला,इतर अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
Advertisements