गडचांदूरातील युवकांची कचरामुक्त होळी कौतुकास्पद.
(अभिनव संस्थेचा “अभिनव” उपक्रम.)
कोरपना(ता.प्र.):-
होळीचा सण सर्वत्र मोठ्या हर्षोल्हासाने साजरा केला जातो.याच पार्श्वभूमीवर गडचांदूर येथील “अभिनव सामाजिक विकास संस्था” तर्फे एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.सदर संस्थेच्या तरुणांनी वास्तव्यास असलेल्या वार्डात सैरावैरा पडलेला संपूर्ण प्लास्टिक व इतर केरकचरा एकत्रित करून जाळले.या अभिनव उपक्रमात नागरिकांनी सुद्धा मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. शहर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी ओला व सुका कचरा इतरत्र न फेकता आपापल्या घरी दोन पद्धतीचे डस्टबीन मध्ये जमा करून नगरपरिषदेच्या घंटागाडीत टाकावे.यामुळे शहर कचरामुक्त होण्यास आपला हातभार लागेल.अशा पद्धतीने मार्गदर्शन करत नागरिकांत जनजागृती करण्यात आली.या सामाजिक उपक्रमात संस्थेचे सदस्य मयुर एकरे,अतुल गोरे,संतोष महाडोळे,वैभव गोरे, प्रदीप परसूटकर यांना तुकाराम चिकटे,विजय अँडस्कार इतर नागरिकांचा सहयोग लाभला. सदर संस्थेच्या तरुणांनी साजरी केलेली कचरामुक्त होळीचे कौतूक होत आहे.