Breaking News

गडचांदूर परिसरात कोरोना वाढीस सिमेंट उद्योग जबाबदार….सिमेंट उद्योगांच्या रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करा-आरोग्य सभापती राहूल उमरे

गडचांदूर परिसरात कोरोना वाढीस सिमेंट उद्योग जबाबदार. 
(सिमेंट उद्योगांच्या रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करा.)
कोरपना(ता.प्र.):-
      कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहराच्या मध्यभागी माणिकगड सिमेंट व परिसरात अंबुजा,अल्ट्राटेक व दालमिया(मुरली)हे नावाजलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिमेंट उद्योग अस्तित्वात आहे.सध्याच्या परिस्थीतीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत असून या मागचे एकमेव कारण परिसरात सुरू असलेले हे उद्योग आहे.कारण राज्यात सर्वत्र लॉकडाऊन,संचारबंदी असताना हे उद्योग प्रचंड मनुष्यबळाने बिनधास्त सुरू आहे.आणि यात काम करणारे कंत्राटी व स्थायी कामगारच मोठ्याप्रमाणात कोरोना बाधित दिसत आहे.हे कामगार प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या एकमेकांच्या संपर्कात येत असल्याने परिसरात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे.याला येथील सिमेंट उद्योगच जबाबदार असून बेड व उपचारासाठी रुग्णांची हेळसांड बघता परिसरातील या उद्योगातील खाजगी रुग्णालयात “कोविड सेंटर” सुरू करावे अशी मागणी वजा विनंती गडचांदूर नगरपरिषद नगरसेवक तथा स्वच्छता व आरोग्य सभापती राहूल उमरे,नगरसेवक तथा गटनेता विक्रम येरणे,नगरसेवक अरविंद मेश्राम यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे,पालकमंत्री विजय वडेट्टीवार व क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
          या उद्योगात आक्सिजन,वेल्टीनेटर, परिचारीकांसह इतर सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध असल्याने याठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यास काहीच अडचण होणार नाही आणि विशेषतः सध्याच्या परिस्थितीत शासन प्रशासनावर आलेला तान तनाव सुद्धा कमी होईल.वास्तविक पाहता ज्याठिकाणी हे उद्योग अडमाप पैसा कमवत आहे,तर माणुसकी म्हणून अशा संकटसमयी तेथील जनतेला उत्तम आरोग्य सेवा पुरवणे यांची नैतिक जबाबदारी नाही का ? असा प्रश्न उपस्थित करत आपण आपल्या स्तरावर पाठपुरावा करून लवकरात लवकर गडचांदूर परिसरातील सिमेंट उद्योगांच्या खाजगी रुग्णालयात कोविड सेटर सुरू करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आता सदर मागणी संदर्भात हे नावाजलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिमेंट उद्योग सकारात्मक प्रतिसाद देतील का ! हे पाहणे मात्र उत्सुकतेचे ठरणार आहे.

About Vishwbharat

Check Also

१५ प्रवासी…भरधाव ट्रॅव्हल व ट्रकची समोरासमोर भीषण धडक

प्रवासी वाहतुक करणाऱ्या ट्रॅव्हल्स व हायवा ट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत २ जण गंभीर जखमी तर …

रुग्णालयात आग : नर्सची हायकोर्टात याचिका

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारी २०२१ रोजी पहाटे लागलेल्या भीषण आगीत ११ बालकांचा दूर्वैवी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *