Breaking News

कल्लूरवार कुटुंबीयांच्या मदतीला सरसावले श्रीकृष्ण नगरवासी. (माणुसकी आजून शिल्लक आहे..!)

Advertisements
कल्लूरवार कुटुंबीयांच्या मदतीला सरसावले श्रीकृष्ण नगरवासी.
(माणुसकी आजून शिल्लक आहे..!)
कोरपना(ता.प्र.):-
     गडचांदूर येथील प्रभाग क्रमांक एक मधील देवराव कल्लूरवार यांच्या घराला दोन दिवसापुर्वी मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे आग लागली.त्यात देवराव यांच्या घरातील कपडे,धान्य,रोख रक्कम,फ्रीज,पंखे व इतर जीवनोपयोगी वस्तू जळून खाक झाले. राहण्याची व जेवणाची मोठी समस्या कल्लूरवार कुटुंबांपुढे निर्माण झाली होती.ही बाब लक्षात घेत येथील न.प.भाजपचे नगरसेवक रामसेवक मोरे यांच्या नेतृत्वात व पुढाकाराने श्रीकृष्ण नगरवासीयांनी संयुक्तरित्या कल्लूरवार कुटुंबांना राशन व आर्थिक मदत केली.सोबतच यांच्या जेवनाची व्यवस्थाही करून दिली.
      हल्लीच्या काळात श्रीकृष्ण नगरवासीयांनी माणुसकीचे दर्शन देत केलेली मदत म्हणजे “माणुसकी अजूनही शिल्लक आहे” असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.नगरसेवक रामसेवक मोरे,किशोर मोरे,महादेव भिसे,मुन्ना गोंडे,नितेश गोंडे,हरीभाऊ झुंगे,रोशन झुंगे,सागर झुंगे,हरि गदाई, कैलाश एकणार,गंगाधर ऐकणार,महादेव ऐकणार,गणेश पवार आदी श्रीकृष्ण नगरवासी कल्लूरवार कुटुंबांच्या मदतीसाठी सरसावले.त्याचप्रमाणे गडचांदूर भाजप शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार, नगरसेवक रामसेवक मोरे,नगरसेवक अरविंद डोहे,रामचंद्र पोटदुखे यांनी घटनास्थळी भेट देऊन देवराव यांना तात्पुरते घर उभारणीसाठी लागणारे साहित्य व स्वयंपाकाचे भांडे,धान्य कीट अशाप्रकारे मदत केली.कल्लूरवार कुटुंबांनी सर्वांचे अगदी मनापासून आभार मानले आहे.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

वनाधिकाऱ्याला अटक : चंद्रपूरातील वाघांच्या शिकारीचे दिल्ली कनेक्शन

राज्यातील वाघांच्या शिकार प्रकरणात सेवानिवृत्त वनाधिकारी मिश्राम जाखड (८१) यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. …

सापामुळे दोन दिवसांपासून गावातील पाणी पुरवठा बंद

विद्युत पुरवठा करणाऱ्या नदीवरील डीपीतील जनित्रात भला मोठा साप अडकून पडल्याने विद्यूत पुरवठा बंद झाला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *