कोविड-१९ ची दहशत षड्यंत्र तर नाही ना ?

सद्या सर्वत्र एकाच दहशतवादाची चर्चा ऐकायला मिळते,ती म्हणजे कोरोना.यामध्ये नेमकी सत्यता काय आहे ? यावर आजही बहुतांश तज्ञाचे एकमत नाही, मात्र याबाबत सोशीयल मिडिया,वृत्तपत्र तथा इलेक्ट्रॉनिक मिडिया मध्ये अग्रक्रमाने कोविडची दहशत निर्माण करणारे  लिखाण व बातम्या दिसतात,ज्यांना वैद्यकीय वा वैज्ञानिक क्षेत्राचे अल्प ज्ञान असलेली मंडळी सोशीयल मीडिया वर अर्थातच फेसबुक व व्हाट्सएप ,ट्विटर युट्यूब व इन्स्टाग्राम आदी सोशीयल मीडियावर आपले मते मांडून जनतेत  संभ्रम निर्माण करीत आहेत. वृत्तपत्र व टेलिव्हिजन वर तर केवळ  कोरोना लागण आणि मृत्यूचे अंक क्रिकेट कॉमेंट्री सारखे सतत दाखविण्यात येत आहेत व यामुळेच जनतेत कोरोनाची  अतिदहशत वाढल्याचे दिसते तर दुसरीकडे सरकार लॉकडाऊन ,टाळेबंदी ,जनताकर्फ्यु,मास्क, अंतर , साबण, सॅनिटायझर याच बाबीचा रोग निदान करण्यासाठी वापर करीत रहा असा उपदेश जनतेला करीत आहेत. आता तर शासनातर्फे लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. ही लस एस्ट्रेजेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी च्या वैज्ञानिका द्वारा सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे खाजगी पार्टनर्शीप द्वारा कोविड वैक्सिन तयार केल्या गेली आहे , सदर लसीवर बऱ्याच देशांनी बुलगेरियात बंदी तर थायलंडमध्ये रक्त गुठळी होण्याचे तक्रारी वरुन रोख लावण्यात आली होती (अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हॅक्सीनचा अभ्यास करण्यासाठी रॉबर्ट एफ. केनेडी याचे प्रमुख देखरेख खाली  व्हॅक्सीन दुष्परिणाम अभ्यास करण्यासाठी शासकीय समिती स्थापन केली ती रिपोर्ट आवश्य बघावे) मात्र या लसीचे मनुष्यमात्रावर काय दूरगामी परिणाम होतील याची कुठलीही शास्त्रीय शास्वती नाही आणि गाजावाजा करून लस घेतल्या नंतरही अनेक धुरंधर पुन्हा कोरोनाग्रस्त झालेले आहेत ( जसे सचिन तेंडुलकर) लस घेतल्यावर पुन्हा मास्क आणि सॅनिटायझर वापर करावेच लागेल , हे सर्व प्रयोग गेल्या मार्च 2020 पासून सुरु आहेत तरीही लागण व मृत्यू आकडे वाढतच आहेत त्यामुळे यावर आता पुनश्च संशोधनाची गरज भासू लागली आहे..                    कोरोना उत्पत्ती चीन मधील वुहान शहरात  31डिसेंबर 2019 ला झाल्याचे प्रथम दर्शनी सर्वच मान्य करतात  परंतु कोरोनावायरस खरे तर David Tyrrell आणि Malcolm Bynoe या ब्रिटीश वैज्ञानिकांनी कॉमन कोल्ड वर काम करीत असताना ब्रिटिश मेडिकल रिसर्च कौन्सिल द्वारा सन 1965 लाच कोरोनावायरस नामाभिधान केले आहे तर डब्ल्यूएचओने 30 जानेवारी  2020 पब्लिक हेल्थ इमेरजन्सी म्हणून  घोषित केले तर याच कोरोनाव्हायरस चे  संक्षिप्त रूप कोविड 19 असे 11फेब्रुवारी2020 ला निश्चित केले तर महामारी म्हणून 11 मार्च 2020 ला घोषित केले व जगातील सर्व देशातील यंत्रणा WHO ने आपल्या ताब्यात ठेवलेली आहे ,भारताला तर डब्ल्यूएचओ आपल्या इशाऱ्यावर नाचवत आहे ,1965 ला निश्चित झालेल्या कोरोनावायरसला 2019 मध्ये एवढया भयावह अवस्थेत का प्रस्तूत करण्यात आले  आहे ? 1965 पासून एकही पेशंट या व्हायरसचा बळी ठरला नसेल काय? हे सर्व गुपित कसे ? यात नक्कीच कुठलेतरी षडयंत्र नाही ना?  यामुळेच हे मानवी जीवनाशी आर्थिक ,राजकीय उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन केलेली खेळी असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे.सुरवातीला सर्दी खोकला ताप ,घसा त्रास या वायरल साथीला एकत्रित करून नव्याने       कोविड19 नाव देण्यात आले ,तसेही मेडिकल विश्वामध्ये नवनविन बिमारीचे लक्षणं शोधून व नामकरण करून जनतेत दहशत निर्माण करून औषधं विकणं हे नित्याचेच झाले आहे. चीनच्या कोरोना उपाययोजना  व पद्धतीवर जगात कुठलीही शंका न घेता त्यांनी केलेल्या सर्वच उपाययोजना जशाच्या तशा बऱ्याच देशाने का  बरे  स्वीकारावे ?  चीनने साथीसोबत पीपीई किट ,टेस्टिंग किट व सर्वच टेस्ट यंत्रे विकसित केली ती जशीच्या तशीच का बरे इतर देशात स्वीकारण्यात आली ? बिमारीचे सोबत लगेच टेस्टिंग किट कशी विकसित होऊ शकते ? सद्या जी  टेस्ट वापरल्या जाते त्या आरटी- पीसीआर टेस्टची validity & Reliability काय यावर अनेक प्रश्न चिन्ह जागतिक स्तरावर  उपस्थित होत आहेत ?  यात RNA सिटी वाल्यू काढण्यासाठी स्वाब स्टीक नाकात टाकून घेतल्या जात आहे, ते सकळी पॉझिटिव्ह तर काही वेळाने निगेटीव्ह, एका ठिकाणी पॉझिटिव्ह तर दुसरीकडे निगेटीव्ह कसे ? यामुळेच नेमके काय सुरु आहे हे सर्व अनुत्तरित आहे. मरणावरही व्यवसाय  तर केल्या जात नाही ना ? कोरनापूर्वी अर्थात 2019 वर्षांत आपल्या देशात 1 कोटी 44 लाख लोक विविध कारणानी व बिमारीने मृत्यु पावलेत तर कोरोना संक्रमणात विविध कारणांनी 1 कोटी 30 लाख मृत्यू झालेत  तर  केवळ कोरोना संक्रमण लागण 1 कोटी 63 लाख, तर 1कोटी 36 दुरुस्त झालेत  व  1 लाख 87 हजार लोक मृत्यू पावलेत तरीही ही महामारी कशी ?  पुढे WHO ने यास लागन बिमारीचे स्वरूप दिले, हे निश्चित होईपर्यंत कोरोनाची  दहशत संपुर्ण विश्वात पेरली गेली यामागचे गुपित काय? राज्यवार सांगायचं झाल्यास यापैकी सर्वात जास्त मृत्यू दर महाराष्ट्र मध्येच का ? महाराष्ट्र राज्याचा आरोग्य यंत्रणा बाबत विचार केल्यास  दिल्ली जर सोडले तर इतर राज्यापेक्षा आरोग्य यंत्रणा चांगली असल्याचं बोलल्या जाते तरीही मृत्यू व लागण दर सर्वांत जास्त महाराष्ट्र राज्यात कसा ? यावरून दररोजच्या मृत्यू आकडेवारीवर नक्कीच संशय येतोय, इतर बिमारीचे उपचार न करता केवळ कोरोनाची ट्रीटमेन्ट केल्यामुळे तर हे होत नसेल ना? डायबिटीस,बीपी,टीबी, टायफॉईड, निमोनिया,हार्ट अटॅक वा इतर आजाराने ग्रस्त असणारे  बिमार तर मृत्यु होत नसतील ना त्यांचीही  गणना कोरोनात करण्यात येत नसेल ना! विशेषतः  दवाखान्यात गेल्या बरोबर चालता बोलता बिमार एकाच दिवसात कसा मरू शकतो ? कदाचित ते कोरोना निदान होताच दहशतीने तर मरत नसतील ना वा कोरोनाच्या चुकीच्या औषधं उपचारामूळे तर मृत्यू  होत नाही ना? या प्रश्नाचे उत्तरें कोण देणार? मृतकाच्या टाळूवरचे लोणी खाणारे कसे देणार? तसेही जागतिक स्तरावर केवळ खूप पैसा कमविण्यासाठीच अनेक देशात बहुतांश युवा मेडिकल डिग्रीचे शिक्षण घेतात (काही अपवाद सोडुन व युनानी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक वगळून), काही तर आपल्या देशात प्रवेश न मिळाल्याने केवळ पैसाचे बळावर देशांतर करून करोडो रुपये खर्च करून मेडिकल शिक्षण घेतात (काही अपवाद सोडून) एवढेच नव्हे तर अशा पदव्या व पदव्युत्तर शिक्षण देणारे खाजगी  स्वायत्त महाविद्यालये,खाजगी विद्यापीठे व अभिमत विद्यापीठे बहुतांश देशात आहेत मग मेडिकल  शिक्षणात  लावलेला पैसा तो काढायचा कसा ह्यासाठी अनेक कलकृत्या व तंत्राचा वापर केल्या जातो  त्यापैकी हे एक तंत्र तर नव्हेना ! सद्यातर मृत्यूनंतर सर्व संपेल हे शिकविण्याचा (जी है तो जहान है) हे देशाचे प्रधानमंत्री सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत व महाराष्ट्र सरकारला जेवढे कोंडीत पकळता येईन तेवढे प्रयत्न आपल्या राजकीय अनुयाया मार्फत करित आहेत मात्र यानिमित्ताने जनतेच्या इतर कल्याण योजना मात्र ठाळेबंद करण्यात आल्या आहेत,उदा. बेरोजगारी,महागाई , शिक्षण ,शेतकरी, कामगार यांच्या समस्या आदी.व दुसरीकडे अनेक सरकारी यंत्रणेचे खाजगीकरण करून विशिष्ट भांडवलदाराची मक्तेदारी जनतेवर लादल्या जात आहे,  असेच (जी है तो जहान है) मृत्यूचे उपदेश सैनिकांना का दिल्या जात नाही ? त्यांना तर मृत्यू म्हणजे बलिदान, शहीद,विरता अशी का बरे शिकवणं दिल्या जात असेल.अश्याच मार्केटिंग मनोविज्ञानाचा वापर करून सर्व जगावर दहशत निर्माण करण्याचा चीनने प्रयत्न केला. बिमारी सोबत टेस्टकिट सुध्दा चीनने विकसित केली, अंगावर घालण्यासाठी पीपीई किट व मृतदेह गुंडाळून विलेवाट लावण्यासाठी प्लास्टिकचा वापर करण्यात आला व त्याचे  चित्रिकरण करून सर्व जगात टेलिव्हिजनद्वारा दाखविण्यात आले यामुळें सर्व जगात कोरोनाच्या दहशतीला सुरवात झाली ती दहशत आज वाढतच आहे .यामध्ये पॉलिथिनचा वापर ,टेस्टिंग किट ,मास्क, ऑक्सिजन,लस या बाबीचे मार्केटिंग तर दुसऱ्या बाजूने राजकिय धुरंधर ,डॉक्टर आणि जागतिक आरोग्य संघटना,दवाखाने आदींचा व्यवसायिक दृष्टिकोन कधी रेमडीसिवर लस बाबतीत तर कधी व्हेंटिलेर व ऑक्सिजन नावाखाली सर्व जनतेने अनुभवला आहे व दररोज वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर द्वारे वाढविण्यात येनारे कोविडची लक्षणं  यात ( पोटदुखी, मळमळ,डोके दुखणे, हात पाय दुखने , जबड्यात त्रास ,जीभ सुखने आदि) याहीपेक्षा इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाद्वारे गेल्या वर्षभरात वाढविण्यात येणारी दहशत यामुळे सामान्य जनतेमध्ये  फोबिया वाढल्यामुळे जनतेची रोगप्रतिकारक क्षमता आपोआपच दिवसेंदिवस कमी होत आहे ,आपल्या देशातील मृत्यू दर कोरोना लागण वर्षापेक्षा  कमी असूनही याला महामारी म्हणून घोषणा करण्याचा प्रयत्न  सर्व राज्यात सुरू आहे,मात्र ज्या राज्यात निवडणूक आहेत तिथे मात्र देशाचे प्रधानमंत्री व गृहमंत्री बिना मास्क लावता लाखोंच्या सभा घेत आहेत तिथे मात्र नीती नियम लावल्या जात नाही वा आपत्ती प्रबंधन कायदा सुद्धा नाही,वारे सरकार!  तसेही लोकशाही देशात आमदार ,खासदार, राष्ट्रपती,राज्यपाल यांची पात्रता भारतीय संविधानानुसार केवळ 25 ,30  व 35 वर्षे वयाची  आहे, बुद्धिमत्ता वा शिक्षण ही पात्रता नाही त्यामुळे विना शिक्षणाने व अल्प शिक्षित मंत्री भारतात  नियोजन कसे करीत असतील यावर न विचार केलेल बरे. महाराष्ट्र राज्यात तर  जे अन्स्कील लेबर व्हायला पाहिजे ते कॅबिनेट मंत्री (काही अपवाद सोडून) आहेत हीच प्रथा परंपरा लोकशाहीत सद्या तरी सर्वच देशात सुरू आहे,उच्च शिक्षित नौकर  आहेत  तर केवळ पैश्याचा जोरावर श्रीमंत राजकारनात (काही राजकीय प्रतिनिधी,पक्ष अपवाद वगळून),एवढेच नव्हे तर आपल्या राज्यात एकाच परिवारातील  बाप लेक मंत्री , एकाच कुटुंबातील बहिणी , भाऊ ,नवरा बायको खासदार ,आमदार आहेत,यामुळेच लोकशाहीचा मुडदा पाडल्या जात आहे ,यावरसुद्धा देशात कायदा व्हायला हवा यावर कुनीही बोलत नाहीत वा संबंधित संविधानातील राजकीय आर्टीकल ( Qualification for President, Members of Parliament, Governor and State  Legislatures Article 58,84,157 and 173) पात्रतेमध्ये आजच्या आधुनिक युगाची गरज लक्षात घेऊन  दुरुस्ती व्हायला हवी परंतु यावर कायदा  कोण करेल ?  शेवटी चोर चोर मावसेरे भाई ना ! बरे असो.                             कोरोनामुळे कुठलाही रोगी घरी तडफडून  मेल्याचे वृत्त आजवर आले नाही परंतु कोविड सेन्टरवर ऍडमिट केल्याबरोबर लगेच वा दुसऱ्या दिवशी मृत्यु पावतो ह्यामुळे कोविड सेन्टरवर दिल्या जाणाऱ्या औषध उपचारावर जनतेचा रोष व संदिग्धता  वाढतच चाललीय, तसेच टेलिव्हिजनच्या चोवीस तास चालणाऱ्या कोरोनाच्या बातम्या केवळ टीआरपी वाढविण्यासाठी वा फॉर्मसी व राजकीय जगाशी जुडून केवळ आर्थिक फायद्यासाठी दाखविण्यात येणाऱ्या मृत्यूच्या बातम्यामुळे जनतेचे मानसिक संतुलन दिवसेंदिवस खचत चाललेय ,जनता मानसिकरित्या दहशतीत जीवन जगत आहे,याहीपुढे असे म्हणता येईल की या दहशतवादी धंद्यात राजकीय पुढारी, फार्मसी जगत कारखाने ,वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ (काही अपवाद सोडून)  केवळ आर्थिक लाभासाठी तर हे सर्व तर करीत नाही ना? यावर जनतेने अवश्य नक्कीच तथ्यावर तर्कशास्त्र वाढवून चिंतन करावे व आपले मानसिक संतुलन ढळू न देता ,स्वतःवर संयम ठेऊन वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवावा,स्वतः सकारत्मक विचार करून कोरोनाची भीती कमी करून दहशत कमी करावे व विश्वास पात्र सामाजिक जाणिवेतून प्रेरित असणाऱ्या वैद्यकीय तज्ञा कडुन उपचार करून घ्यावेत व स्वतःची ईम्यूनिटी सिस्टम वाढविण्यासाठी कोरोनाच्या टेलिव्हिजन चॅनेलच्या जाहिरातवजा मार्केटिंग बातम्यापासून सावध व्हावे व सरकारनेसुध्दा शासकीय स्तरावर सामजिक जाणिवा जोपासणाऱ्या व मनोविज्ञानामध्ये (Psychology) उच्च शिक्षण घेतलेले मनोवैज्ञानिक समुपदेशना करीता नियुक्त करावेत व जनतेने बौद्धिक क्षमता वाढवुन  वैज्ञानिक चिंतन करावे ही नम्र विनंती.
-डॉ.सत्यपाल कातकर-
-मनोवैज्ञानिक तथा शैक्षणिक समुपदेशक-
-विशेष प्रतिनिधी,-न्यु दिल्ली-

About Vishwbharat

Check Also

मुसलमानों को भड़काकर आतंकी संगठन में भर्ती? NIA कोर्ट क्या है फैसला?

मुसलमानों को भड़काकर आतंकी संगठन में भर्ती टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट कोलकाता। मुसलमानों को …

नवंबर में भीषण गर्मी का वैज्ञानिक रहस्य

नवंबर में भीषण गर्मी का वैज्ञानिक रहस्य टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   नई दिल्ली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *