Breaking News

एसबीआय ग्रामसेवा प्रकल्पामुळे मिळाला चार युवकांना रोजगार

Advertisements
एसबीआय ग्रामसेवा प्रकल्पामुळे मिळाला चार युवकांना रोजगार
वर्धा जिल्हा प्रतिनिधी:
एसबीआय ग्रामसेवा प्रकल्प व दिलासा संस्था घाटंजी. यांच्या अंतर्गत  गेल्या 3 वर्षांपासून  आर्वी तालुक्यातील पांजरा, सुकळी, उमरी, भादोड, बोथली, या गावांमध्ये आदर्श गावाचे काम सुरू आहे , यामध्ये प्रकल्प गावातील युवकांना रोजगार कसा प्राप्त होईल हा सुद्धा विचार करीत असते, याच अनुषंगाने , मागील काही दिवसात बोथली येथील 7 युवकांना प्रकल्पामार्फत आरएसईटीआय वर्धा येथे पाठविण्यात आले , तेथे जाऊन युवकांनी दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण घेतले , नन्तर काही दिवसात 7 पैकी 5 युवकांनी आपले उद्योग अर्जासबंधी अर्ज बँक ऑफ इंडिया रोहना येथे  सादर केले , यांनतर 15 दिवसात 4 युवकांचे अर्ज बँकेने मान्य करून प्रत्येकी 20 हजार प्रमाणे कर्ज दिले , व युवकांनी आपल्याच गावात दुग्ध व्यवसाय सुरू केला, याकरिता समाज कार्यकर्ते श्री रवींद्र तांदुळकर व श्री मंगेश पांडे परिश्रम घेत आहे ,
कर्ज घेतलेल्या युवकांनी सदर रकमेची नियमितपणे परतफेड केल्यास 1 लाख पर्यंत कर्ज आम्ही देऊ,ज्यामुळे त्यांच्या व्यवसायात आणखी वृद्धी होईल,
प्रीती हिरडकर -बँक व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया रोहना
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

सरकारी नोकरी पाहिजे? ना परीक्षा ना मुलाखत

सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *