Breaking News

आयुर्वेद रुग्णालयात १०० खाटांचा दक्षता विभाग सालोड येथील कोविड केअर सेंटर कार्यान्वित

आयुर्वेद रुग्णालयात १०० खाटांचा दक्षता विभाग
सालोड येथील कोविड केअर सेंटर कार्यान्वित
सावंगी-दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ संचालित सालोड हिरापूर येथील महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रात कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी नव्याने कार्यान्वित कोविड केअर सेंटरचे उदघाटन संस्थेचे विश्वस्त माजी आमदार सागर मेघे, उपजिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा प्रशासनाद्वारे खाजगी तत्वावर १०० रुग्णखाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत आयुर्वेद रुग्णालयाला मान्यता देण्यात आली आहे.
सध्या सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या शालिनीताई मेघे सुपरस्पेशालिटी सेंटरमध्ये सुमारे ६०० रुग्णखाटांचा स्वतंत्र कोविड वॉर्ड कार्यरत आहे. मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने सद्यकालीन यंत्रणाही अपुरी पडते आहे. रुग्णालयीन जीवनदायी सेवांची मर्यादित क्षमता बघता अतिगंभीर रुग्णांव्यतिरिक्त अन्य प्रत्येक बाधित रुग्णाला भरती करणे शक्य नाही. मात्र, ज्या रुग्णांना सातत्यपूर्वक डाॅक्टरांच्या देखरेखीखाली राहणे आवश्यक आहे, त्यांच्याकरिता खाजगी तत्वावर सालोड येथील आयुर्वेद रुग्णालयात सदर कोविड केअर सेंटरची सुविधा सुरु करण्यात आली आहे. या दक्षता केंद्रात मेडिसिनतज्ज्ञ डॉक्टरांची व परिचारिकांची चमू २४ तास कार्यरत राहणार असून भरतीकाळात रुग्णांना चहा, नाश्ता, सकस आहार, औषधोपचार, वैद्यकीय समुपदेशन, आयुर्वेदतज्ज्ञांचे मार्गदर्शन, श्वसन क्षमता वाढविणारे व्यायाम, आयुर्वेदिक काढा अशा उपयुक्त सुविधा तसेच आकस्मिक उपचारांची गरज भासल्यास वैद्यकीय सेवाही उपलब्ध राहणार आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणेद्वारे संदर्भित केलेले रुग्ण भरती करण्यात येणार असून त्यांना शासनाच्या निर्धारित सेवाशुल्कातच आरोग्यसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
या दक्षता विभागाच्या उदघाटनप्रसंगी संस्थेचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बाबाजी घेवडे, मेडिसिनतज्ज्ञ डॉ. सतीश महाजन, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. गौरव सावरकर, कोविड केअर सेंटरचे नोडल अधिकारी डॉ. सत्यम सुपारे, डॉ. सौरभ देशमुख, डॉ. पूनम सावरकर, डॉ. स्वाती मुंढे, डॉ. विनोद आडे, डाॅ. ऋषिकेश ठाकरे, डॉ. रोहित वासकर यांची उपस्थिती होती. वैद्यकीय उपचारांसोबतच कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा देणाऱ्या आवश्यक सर्व सुविधा या केंद्रावर अत्यल्प सेवाशुल्कात उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी सागर मेघे यांनी रुग्णालय प्रशासनाला केल्या आहेत.

About Vishwbharat

Check Also

मिरगी रोग निवारण के लिए कृत संकल्पित हैं स्वास्थ्य चिकित्सा विशेषज्ञ डॉ.नागेंद्र शर्मा?

मिरगी रोग निवारण के लिए कृत संकल्पित हैं स्वास्थ्य चिकित्सा विशेषज्ञ डा नागेंद्र शर्मा?   …

कीटनाशक छिड़काव की वजह से विनष्ट हो रहे है रामबाण जैविक औषधीय बीरबहूटी

कीटनाशक छिड़काव की वजह से विनष्ट हो रहे है रामबाण जैविक औषधीय बीरबहूटी   टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *