राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५६ व्या पुण्यतिथी निमित्त गुरुकुंज अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे श्रध्दांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सर्व गुरुदेव सेवकांनी आशिर्वाद घेतला. यावेळी प्रकाश भालेराव सेवाधिकारी कामठी तालुकाध्यक्ष राजाभाऊ रेवतकर श्री संत रविदास महाराज विचार मंच,बाजीराव ढेंगरे उपाध्यक्ष धनगौरी जेष्ठ नागरिक मंडळ महादुला रामाजी ढेंगरे उपाध्यक्ष ग्रामगीता आश्रम श्रीगुरुदेव सेवा मंडळ महादुला विनोद मिरासे प्रचारक कामठी तालुका गोलु किंद्रे प्रचारक सावनेर आदी उपस्थित होते.