Breaking News

शिधापत्रिकाधारकांना दोन महिन्याचे धान्य मिळणार मोफत

शिधापत्रिकाधारकांना दोन महिन्याचे धान्य मिळणार मोफत

Ø 2 लक्ष 62 हजार 882  लाभार्थ्याना मिळणार लाभ

        वर्धा,दि 7 (जिमाका):-  कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव बघता शासनाने मजुर, शेतमजुर, शेतकरी अंत्योदय,  आणि प्राधान्य गटातील नागरिकांच्या अन्नाधान्याची गरज लक्षात घेवून  त्यांना आता मे व जुन या दोन महिन्याचे सुध्दा अन्न्धान्य मोफत देण्यात येणार  आहे. याचा लाभ जिल्ह्यातील  2 लाख 62 हजार  882 शिधापत्रिका धारकांना मिळणार आहे.

   राज्यातील आपातकालिन परिस्थिती विचारात घेता आणि ब्रेक दि चेन अंतर्गत लागलेल्या निर्बंधामुळे  गरीब कुटुंब उपाशी राहू नये यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना मे व जुन या दोन महिन्याचे शिधा मोफत  उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

          शेतकरी कुंटूंब लाभार्थी  योजनेच्या  शिधापत्रिका धारकांना  या योजनेचा लाभ मिळणार नाही. केवळ अंत्योदय  व प्राधान्य  गटातील  शिधापत्रिका धारकांना  या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील 857 रास्तभाव दुकानातुन  प्रधानमंत्री गरीब कल्याण  योजनेअंतर्गत  रास्तभाव  दुकांनाना मोफत धान्याची पोहोच  करण्याची प्रक्रिया  चालु असुन  जिल्हयातील 2 लाख 62 हजार 882  पात्र प्राधान्य  कुटंब लाभार्थी व अंत्योदय  शिधापत्रिका धारकांना  प्रति सदस्य 3 किलो गहू व 2 किलो तांदुळ  याप्रमाणे एकुण  5 हजार 482 मेट्रीक टन  धान्य मोफत  पुरविण्यात येणार आहे.

          . सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्दारे वितरण होणा-या अन्नधान्य  वितरणाबाबत व प्रधानमंत्री  कल्याण  योजनेच्या अन्नधान्याच्या  वितरणाबाबत काही तक्रारी असल्यास शिधापत्रिका धारकांनी सबंधित तहसिल कार्यालयात किंवा  किंवा  जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या  dsowar.1234@gmail.com  या ईमेल तक्रार दाखल करावी . तसेच  अन्न नागरी   पुरवठा  व ग्राहक सरंक्षण  विभागाच्या 1800224950 या टोल फ्री क्रमांकावर  तक्रार सादर करावी.  असे जिल्हा पुरवठा विभागाने कळविले आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *