Breaking News

गडचिरोलीत 13 नक्षलवाद्यांचा ‘खात्मा’ – पोलीस, सी ६० पथकाला मोठे यश

Advertisements

गडचिरोलीत 13 नक्षलवाद्यांचा ‘खात्मा’
  – पोलीस, सी ६० पथकाला मोठे यश
गडचिरोली,
पोलीसनामा ऑनलाइन – नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलीस, सी ६० पथक आणि नक्षलवादी यांच्यात मध्यरात्रीपासून चकमक सुरु असून त्यात आतापर्यंत १३ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे. याशिवास अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस मदत केंद्रांच्या हद्दीतील पैदी जंगल परिसरात ही चकमक उडाली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली सी ६० पथक नक्षलविरोधी अभियान राबवत आहेत.

Advertisements

सध्या गडचिरोली भागात तेंदुपत्ता गोळा करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर चालते. याच्या व्यापारातून नक्षलवादी मोठ्या प्रमाणावर खंडणी गोळा करतात. यासंदर्भात नक्षलवाद्यांची एक बैठक पैदी जंगलात होणार असल्याची माहिती सी ६० पथकाला मिळाली होती. त्यानुसार या पथकाने जंगलात सर्च ऑपरेशन सुरु केले. हे ऑपरेशन सुरु असताना पहाटेच्या सुमारास नक्षलवाद्यांबरोबर या कमांडोंची चकमक उडाली. ही चकमक अजूनही सुरु असल्याचे सांगण्यात येत असून कमांडोंनी केलेल्या गोळीबारात अनेक नक्षलवादी जखमी झाले आहेत.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

वनाधिकाऱ्याला अटक : चंद्रपूरातील वाघांच्या शिकारीचे दिल्ली कनेक्शन

राज्यातील वाघांच्या शिकार प्रकरणात सेवानिवृत्त वनाधिकारी मिश्राम जाखड (८१) यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. …

सापामुळे दोन दिवसांपासून गावातील पाणी पुरवठा बंद

विद्युत पुरवठा करणाऱ्या नदीवरील डीपीतील जनित्रात भला मोठा साप अडकून पडल्याने विद्यूत पुरवठा बंद झाला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *