बॅटरी,टायर चोरांना २४ तासांच्या आत ३ आरोपींना ठोकल्या बेड्या.
(गडचांदूर पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी,१ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त.)
कोरपना(ता.प्र.)
मनोज बापूराव खेवले रा.घुग्गुस यांच्या मालकीच्या ट्रकची २ बॅटरी,५ टायर असा एकूण १ लाख २० हजार रुपयेचा माल चोरीला गेला होता.खेवले यांनी यासंबंधीची तक्रार गडचांदूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली असता अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्रं. १८०/२०२१ कलम ३७९ अनव्य गुन्हा दाखल करण्यात आला.उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गोपाल भारती यांच्या नेतृत्वात अवघ्या २४ तासांच्या आत ३ आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करून साकीब हदीस शेख वय २०,जाकीर हदीस शेख वय २६,सद्दाम सिरीज अन्सारी वय २८ सर्व राहणार गडचांदूर वार्ड क्रं ६ येथील रहिवासी असून एएसआय शकील अन्सारी,एनपीसी धर्मराज मुंडे,विनायक धुर्वे,खंडू मुंडकर यांचा तपास पथकात समावेश होता.अवघ्या २४ तासांच्या आत आरोपीला गजाआड केल्याबद्दल गडचांदूर पोलीसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.