वर्धा : महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कारसाठी अर्ज आमंत्रित:समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त

वर्धा, जिल्हा प्रतिनिधी सचिन पोफळी :- दि. 7  :- विरशैव-लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक समाज प्रबोधन व साहित्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार व समाज सेवकांना आणि यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

सदर पुरस्कार दोन गटात दिले जाणार आहे. त्यातील व्यक्तीगत पुरस्कार 25 हजार रोख तर संस्थात्मक पुरस्कार 51 हजार रुपये रोख व सन्मानपत्र, स्मृती चिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

व्यक्तीगत पुरस्कारासाठी अर्जदार व्यक्तीने विरशैव-लिंगायत समाजाकरिता कलात्मक व साहित्यिक क्षेत्रात किमान 10 वर्षे कार्य केलेले आसावे. अर्जदार पुरुषाचे वय किमान 50 वर्षे व स्त्रियांचे किमान 40 वर्षे इतके असावे. पुरस्कारासाठी कोणत्याही समाजातील व्यक्तीचा विचार करण्यात यईल.

संस्थात्मक पुरस्कारासाठी संस्था नोंदणीकृत असावी, स्वयंसेवी संस्थेने समाज कल्याण क्षेत्रात विरशैव-लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक, समाज प्रबोधन व साहित्य क्षेत्रात कार्य, अन्याय निर्मुलन, अंधश्रध्दा निर्मुलन इत्यादी क्षेत्रात किमान 10 वर्षे काम केलेले असावे.

स्वयंसेवी संस्था राजकारणापासून अलिप्त असावी. उपरोक्त अटी व शर्ती पुर्ण करणाऱ्या व्यक्ती व संस्थानी विहीत नमुन्यातील अर्ज तिन प्रतित 31 जानेवारी पुर्वी कार्यालय, सहायक आयुक्त, समाज कल्याण, वर्धा येथे पाठवावे. अर्जाचा नमुना व अधिक माहितीसाठी कार्यालयात संपर्क साधावा, असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी कळविले आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील बारूद कंपनीत स्‍फाेट : कामगारांचा जागीच मृत्‍यू

नागपूर (Nagpur)जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली पासून जवळच असलेल्या कोतवालबड्डी येथील एसबीएल नामक बारूद कंपनीमध्ये आज …

१२ भाविकांचा मृत्यू : मौनी अमावस्येला महाकुंभात चेंगराचेंगरी : शाही स्नान रद्द

महाकुंभ येथील संगम घाटावर बुधवारी पहाटे संगम येथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने या पवित्र सोहळ्याला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *