Breaking News

वर्धा येथे स्व,सिंधुताई सपकाळ यांचे स्मारक बनविण्यात यावे:अंबिका हिंगमीरे,वीरांगना बिग्रेड संस्थापक अध्यक्ष

Advertisements

वर्धा येथे स्व,सिंधुताई सपकाळ यांचे स्मारक बनविण्यात यावे:अंबिका हिंगमीरे वीरांगना बिग्रेड संस्थापक अध्यक्ष यांची मागणी

Advertisements

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- अनाथांची माय अशी उपाधी असलेल्या पद्मश्री स्व . सिंधुताई सपकाळ यांचे वर्धा जिल्हयाशी अनोखे नाते आहे . त्यांचे माहेर आणि सासर हे दोन्ही वर्धा जिल्हयात असुन त्यांच्या कार्यकर्तृत्वाची झालर ही वर्धा जिल्हयात सुध्दा लाभली आहे . या जिल्हयातुन त्यांनी अनाथांची माय बनुन सातासमुद्रापार स्वतःची आणि जिल्हयाची ओळख निर्माण करून दिली . वर्धा जिल्हयात त्यांनी कायम वास्तव्य केले आहे आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी , त्यांचे कार्य देशभर पोहोचविण्यासाठी वर्धा शहरात त्यांचे स्मारक होणे ही वर्धा जिल्हयासाठी आणि राज्यासाठी अभिमानस्पद बाब असेल . भावी पिढीला त्यांच्या कार्याची माहिती होण्याच्या उद्देशाने त्यांचे स्मारक हे एक ऊर्जा केंद्र म्हणुन समोर येईल ,स्व . सिंधुताई सपकाळ यांनी हजारो अनाथ मुलांना पोटाशी कवाळुन त्यांना सन्मानाने जगविले , मोठे केले आणि स्वतःच्या पायावर उभे केले . अत्यंत बिकट परिस्थितीतुन आलेल्या माईंनी अनेक संकटाशी सामना करुन देशातल्या कर्तृत्ववान महिलांमध्ये स्थान मिळविले आहे . त्यामुळे वर्धा शहरात स्व .सिंधुताई सपकाळ यांचे स्मारक वर्धेत लवकरात लवकर व्हावे अशी मागणी वीरांगना बिग्रेडच्या संस्थापक अध्यक्षा अंबिका हिंगमीरे यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे,यावेळी इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

बालासोर रेल हादसे के घायलों को अस्पताल में दिए जा रहे 50 हजारः PM मीदी आज जाएंगे बालासोर

ओडिशा के बालासोर में शुक्रवार शाम को कोरोमंडल एक्सप्रेस के चार डिब्बे मालगाड़ी से टकराने …

20 साल बाद रेल का बडा हादसा : उडीसा के बालासोर में 300 से ज्यादा यात्रियों की मौत : 1000 से ज्यादा घायल !

ओडिशा के बालासोर जिले में कोरोमंडल एक्सप्रेस और मालगाड़ी आपस में टकरा गई है. जाणकारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *