Breaking News

दिवाळीपूर्वी छापेमारी : नागपुरात २० लाखांचा भेसळयुक्त अन्नपदार्थ साठा जप्त

विश्व भारत ऑनलाईन :
अन्न व औषध प्रशासनाने नागपुरात राबविलेल्या मोहिमेत तब्बल २० लाखांचा अन्नपदार्थांचा भेसळयुक्त साठा जप्त केला. नागपुरात १६ ठिकाणी धाड टाकण्यात आली. यामध्ये १० हजार ८८३ किलो वजनाच्या अन्नपदार्थांचा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त केला. जप्त केलेल्या मालाची किंमत २० लाख १९ हजाराच्या घरात आहे. यात तेलापासून वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचा समावेश आहे.

दिवाळीच्या काळात अन्न पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता असते. त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन विभागाने नागपूरमध्ये धडक मोहीम राबवते. जवळपास वीस लाखांचा अन्नपदार्थांचा भेसळयुक्त साठा जप्त केल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात अन्न पदार्थांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असते. मात्र, त्याचा फायदा काही व्यापारी घेतात. भेसळयुक्त माल बाजारात आणतात. यावर लक्ष ठेवत अन्न व औषध विभागाने ही खास मोहीम राबवली आहे.

About विश्व भारत

Check Also

पत्नी की हैवानियत : नौ बच्चों की मां ने करवा दी पति की हत्या

पत्नी की हैवानियत : नौ बच्चों की मां ने करवा दी पति की हत्या टेकचंद्र …

प्यार मे पागल भांजे संग होटल में सुहागरात : पोल खुलते ही खाया जहर

प्यार मे पागल भांजे संग होटल में सुहागरात : पोल खुलते ही खाया जहर टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *